agriculture news in Marathi heavy rain prediction in Vidarbha Maharashtra | Page 2 ||| Agrowon

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने जोरदार सरी येत आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 

पुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने जोरदार सरी येत आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गुजरात आणि परिसरावर असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत असून, ते पश्‍चिमेकडे सरकून गेले आहे. तर मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची पूर्वेकडील बाजू हिमालयाच्या पायथ्याकडे सरकली आहे, हा आस पंजाबच्या अमृतसरपासून बिहारच्या भागलपूरपर्यंत विस्तारला आहे. तर पश्‍चिम किनाऱ्याला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा कर्नाटकपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत कायम आहे. 

कोकणात सर्वदूर पाऊस पडणार असून, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाटमाथा धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी येणार आहेत. तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....