विदर्भात मुसळधारेचा इशारा 

राज्याच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण कोकण व पूर्वविदर्भात मुसळधार पाऊस पडेल.
Hawaman
Hawaman

पुणे : राज्याच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण कोकण व पूर्वविदर्भात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. 

सध्या मॉन्सून उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने सरकत आहे. त्यामुळे वातावरणात चांगलेच बदल होत आहे. कोकणात दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असली तरी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. गुरुवारी (ता.१०) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील वाशीम येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडत असल्याने हवेत गारवा वाढल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात ते आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकण विभागात तापमानात मोठी घसरण झाली आहे. या भागात कमाल तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात तापमान चांगलीच घट झाली असून, महाबळेश्‍वर येथे सर्वांत १८.७ अंश सेल्सिअसचे सर्वांत कमी कमाल तापमान नोंदविले गेले. या भागात १८ ते ३३, मराठवाड्यात ३३ ते ३५, तर विदर्भात ३३ ते ३६ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान नोंदविले गेले.  या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस  शुक्रवार ः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ  शनिवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ  रविवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ  सोमवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 

गुरुवारी (ता.१०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) २६.४ 
  • अलिबाग - २७ 
  • रत्नागिरी - २८.५ 
  • डहाणू - २९.८ 
  • पुणे - २५.८ 
  • कोल्हापूर - २७.३ 
  • महाबळेश्वर - १८.७ 
  • मालेगाव - ३३.६ 
  • नाशिक - २९.७ 
  • सांगली - २८.६ 
  • सातारा - २६.८ 
  • सोलापूर - ३२.४ 
  • औरंगाबाद - ३३ 
  • परभणी - ३३.६ 
  • बीड - ३५.३ 
  • अकोला - ३४.५ 
  • अमरावती - ३५.४ 
  • बुलडाणा - ३३.४ 
  • ब्रम्हपुरी - ३५.१ 
  • चंद्रपूर - ३६ 
  • गोंदिया - ३६.२ 
  • नागपूर - ३६ 
  • वाशीम -- ३७ 
  • वर्धा - ३६   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com