agriculture news in Marathi heavy rain prediction in vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात मुसळधारेचा इशारा 

शुक्रवार, 11 जून 2021

राज्याच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण कोकण व पूर्वविदर्भात मुसळधार पाऊस पडेल.

पुणे : राज्याच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण कोकण व पूर्वविदर्भात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. 

सध्या मॉन्सून उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने सरकत आहे. त्यामुळे वातावरणात चांगलेच बदल होत आहे. कोकणात दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असली तरी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. गुरुवारी (ता.१०) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील वाशीम येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडत असल्याने हवेत गारवा वाढल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात ते आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकण विभागात तापमानात मोठी घसरण झाली आहे. या भागात कमाल तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात तापमान चांगलीच घट झाली असून, महाबळेश्‍वर येथे सर्वांत १८.७ अंश सेल्सिअसचे सर्वांत कमी कमाल तापमान नोंदविले गेले. या भागात १८ ते ३३, मराठवाड्यात ३३ ते ३५, तर विदर्भात ३३ ते ३६ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान नोंदविले गेले. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
शुक्रवार ः
संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 
शनिवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 
रविवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 
सोमवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 

गुरुवारी (ता.१०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) २६.४ 
 • अलिबाग - २७ 
 • रत्नागिरी - २८.५ 
 • डहाणू - २९.८ 
 • पुणे - २५.८ 
 • कोल्हापूर - २७.३ 
 • महाबळेश्वर - १८.७ 
 • मालेगाव - ३३.६ 
 • नाशिक - २९.७ 
 • सांगली - २८.६ 
 • सातारा - २६.८ 
 • सोलापूर - ३२.४ 
 • औरंगाबाद - ३३ 
 • परभणी - ३३.६ 
 • बीड - ३५.३ 
 • अकोला - ३४.५ 
 • अमरावती - ३५.४ 
 • बुलडाणा - ३३.४ 
 • ब्रम्हपुरी - ३५.१ 
 • चंद्रपूर - ३६ 
 • गोंदिया - ३६.२ 
 • नागपूर - ३६ 
 • वाशीम -- ३७ 
 • वर्धा - ३६ 
   
टॅग्स

इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...