agriculture news in Marathi heavy rain prediction in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात मुसळधारेची शक्यता 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील बहुतांशी भागात बदल होत आहे. कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी आहे.

पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील बहुतांशी भागात बदल होत आहे. कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी आहे. विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी मेघगर्नजेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सध्या मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण आहे. तर कोकण व विदर्भाच्या काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मराठवाड्यात पावसाची उघडीप असून तापमानात काहीशी वाढ झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे तापमानाचा पारा १९.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. गुरुवारी (ता.१७) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

कोकणात होत असलेल्या पावसामुळे कमाल तापमान २६ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानही किंचित कमी झाले आहे. या भागात १९ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. मराठवाड्यातही तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

मॉन्सूनला पोषक वातावरण 
उत्तर भारतात मॉन्सून पोषक वातावरण नसल्याने तीन दिवसांपासून रेंगाळला आहे. मात्र गुजरात व उत्तर प्रदेशच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. एक ते दोन दिवसांत या भागांत मॉन्सून हळूहळू सरकण्याचे संकेत हवामान विभागाच्या सूत्रांनी दिले. रविवारपासून मॉन्सून दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमिरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरच्या भागातच आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना आणि दिल्ली भागांत अजूनही मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. राजस्थानचा पूर्व भाग ते बंगालचा उपसागराचा वायव्य भाग या दरम्यान असलेल्या मध्य मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा नैर्ऋत्य भाग, दक्षिण बिहार झारखंड, पश्‍चिम बंगाल या भागात गेल्या तीन दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
शुक्रवार ः
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 
शनिवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 
रविवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ 
सोमवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, 

गुरुवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) २९.५ 
  • अलिबाग - २६.४ 
  • रत्नागिरी - २७.७ 
  • डहाणू - ३३.१ 
  • पुणे - २८.१ 
  • जळगाव -- ३९ 
  • कोल्हापूर - २५.६ 
  • महाबळेश्‍वर - १९.५ 
  • मालेगाव - ३६.८ 
  • नाशिक - २९.५ 
  • सांगली - २७.४ 
  • सातारा - २६.४ 
  • सोलापूर - ३२.८ 
  • औरंगाबाद - ३३ 
  • परभणी -- ३५.१ 
  • बीड -- ३५ 
  • अकोला - ३५.७ 
  • अमरावती - ३४.४ 
  • बुलडाणा - ३५.० 
  • ब्रह्मपुरी - ३४.७ 
  • चंद्रपूर - ३२.८ 
  • गोंदिया - ३३.५ 
  • नागपूर - ३५ 
  • वर्धा - ३५.८ 

इतर बातम्या
कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यतापुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप...
राज्यस्तरीय ‘आत्मा’ समितीत ३०...पुणे ः राज्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
खासगी उद्योजकांच्या अवजारांवर अनुदानपुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच खासगी...
एक हजार नव्या रोपवाटिका होणारपुणे ः राज्यात नव्याने एक हजार रोपवाटिका...
भारतात उत्पादित ड्रॅगन फ्रूटची...नाशिक : गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून...
अकोलखेडमधील पाऊस नोंदी दिशाभूल करणाऱ्याअकोला ः जिल्ह्यातील अकोलखेड महसूल मंडळात जून,...
रत्नागिरीत अतिवृष्टीमुळे हजार कोटींचे...रत्नागिरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीतील श्री...
‘शेतकऱ्यांची पोरं’ करणार  बळिराजाला...उजनी, जि. लातूर ः पावसामुळे पिकांच्या झालेल्या...
नगर : पशुचिकित्सा व्यवसायिकांचे  काम...नगर : पशुचिकित्सा व्यावसायिक (डिप्लोमा,...
अतिवृष्टी, पूरबाधितांचे पंचनामे तत्काळ...नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
सांगलीत सोळा हजारांहून अधिक पंचनामे...सांगली  : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व...
चासकमान धरण ‘ओव्हर फ्लो’चास, जि. पुणे : खेड तालुक्याच्या पश्चिम...
सोलापूर ः`‘किसान रेल्वे’ला जेऊरला...सोलापूर ः किसान रेल्वेला जेऊर (ता. करमाळा)...
‘तौक्ते’ नुकसानग्रस्तांना २५ कोटींच्या...सिंधुदुर्गनगरी : तौक्ते चक्रीवादळात झालेल्या...
‘पोकरा’च्या कामकाजावरील ग्रामसेवकांचा...अकोला : राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
अकोल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन...अकोला : मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे...
अंतापूर, ता. सटाणा : शून्य ऊर्जेवर...अंतापूर, ता. सटाणा : सटाणा तालुक्यातील खालचे...
परभणी, हिंगोलीत नऊ हजार शेतकऱ्यांची...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने ८० हजार...परभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता.१२) ते गुरुवार (ता....