agriculture news in marathi, Heavy rain predition in Konkan | Agrowon

कोकणात आज मुसळधारेचा इशारा; राज्यात वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

पुणे : सकाळी उन्हाचा चटका वाढून, दुपारनंतर स्थानिक वातावरणात वेगाने बदल होत राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत आहे. कमी कालावधीत पडणाऱ्या पावसाने काही काळात सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे : सकाळी उन्हाचा चटका वाढून, दुपारनंतर स्थानिक वातावरणात वेगाने बदल होत राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत आहे. कमी कालावधीत पडणाऱ्या पावसाने काही काळात सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

अरबी समुद्रातील ‘क्यार’ वादळाची तीव्रता कमी होत असून, ओमानच्या किनाऱ्यालगत ‘सलालाह’पासून ९३० किलोमीटर पूर्वेकडे घोंगावत आहे. दक्षिणेकडे वळून सोकोट्रा बेटाकडे जाताना चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होणार आहे. यातच केरळच्या किनाऱ्यालगत लक्षद्वीप व मालदीव बेटांजवळ तीव्र कमी दाबक्षेत्राची निर्मिती झाली आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३१) या कमी दाबक्षेत्राची तीव्रता वाढून, कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे केरळ, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत तशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्र खवळणार आहे. 

दिवसभर उन्हाचा चटका वाढल्याने स्थानिक वातावरणात बदल होत, ढगांची निर्मिती होत आहे. सायंकाळी किंवा रात्री उशिरा विविध भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडत आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने राज्यात तापमान तिशीपार गेले आहे. बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३५.३ अशं सेल्सिअस तापामनाची नोंद झाली. जवळपास सर्वच प्रमुख ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. पुढील काही दिवस दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ आणि दुपारंनतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.४ (०.३), जळगाव ३२.० (-२.०), कोल्हापूर ३०.४ (-०.५), महाबळेश्वर २५.२ (-०.३), मालेगाव ३०.२ (-२.५), नाशिक २९.८ (-१.९), सांगली ३१.३ (-०.४), सातारा ३०.१ (०.१), सोलापूर ३२.६ (०.६), अलिबाग ३२.९ (-०.३), डहाणू ३२.९ (-०.४), सांताक्रूझ ३४.५ (०.३), रत्नागिरी ३४.७ (१.४), औरंगाबाद २९.७ (-१.३), परभणी ३०.४ (-१.०),  नांदेड ३३.० (०.७), अकोला ३२.२ (-०.४), अमरावती ३१.६ (-०.८), बुलडाणा ३०.६ (०.९), ब्रह्मपुरी ३५.३ (४.०), चंद्रपूर ३२.८ (१.०), गोंदिया ३१.५ (०.०), नागपूर ३२.४ (०.८), वर्धा ३१.८ (०.३), यवतमाळ ३१.० (०.४).


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...