पुणे जिल्ह्याला पावसाचा तडाखा

पाऊस
पाऊस

पुणे ः देशातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाली. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये येथे ढगफुटी होऊन ३०७ मि.मी. पाऊस पडला. याशिवाय पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने दाणादाण केली. वऱ्हाडात सर्वदूर मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी सरी पडल्या. नाशिकसह जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर आणि पूर्व विदर्भातील ठिकठिकाणी पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.   मुसळधार पावसामुळे अनेक भागात ओढे, नाले पुन्हा खळाळून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी नाझरे, वीर, खडकवासला, नांदूर मध्यमेश्वर, गंगापूर, दारणा, पालखेड, उजनी आणि जायकवाडी या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुळा, कऱ्हा, गोदावरी, भिमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.  

पुणे जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे पुण्यातील सासवड, पौड, वेल्हे पुणे शहरातील कात्रज, सहकारनगर, वारजे, चतुश्रृगी, दत्तवाडी, बालाजीनगर, संतोषनगर, आंबेगाव खुर्द, कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारउपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंती खचल्याने काही ठिकाणी घरे पडली. त्यामुळे पुणे शहरातील अकरा व्यक्तींचा मृत्यू झाला. भोरमधील ससेवाडी येथे ओढ्याचे पाणी शेतात गेल्याने पीक व माती वाहून गेली आहे. खोपी येथेही पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. साळवडे ते केळवडे पूलही पाण्याखाली गेला आहे.  

तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारीही (ता.२५) दिवसभर हवामान ढगाळ होते. सायंकाळी आठ वाजेनंतर अचानक मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याने जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली. तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. 

औरंगाबादमधील अंबड परिसरात गुरुवारी हलक्या सरी कोसळल्या. तर जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या भागात हवामान अंशत: ढगाळ होते, तर तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. मध्य महाराष्ट्रातील नाशिक शहर व पश्चिम व उत्तर पट्ट्यात हलका पाऊस पडला असून बहुतांशी भागात हवामान ढगाळ होते. खान्देशातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती.  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, कोल्हापूर भागातही हवामान ढगाळ होते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील बहुतांशी भागात हवामान ढगाळ होते. 

कोकणातील सुधागड पाली ८७ मिलिमीटर पाऊस पडला. तर डहाणू, संगमेश्वर देवरूख, पेण, मुरूड येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर पुरंदरनंतर श्रीरामपूर येथे ७४ मिलिमीटर पाऊस पडला. पुणे, शिरूर, वेल्हे, मुक्ताईनगर, दिंडोरी, सुरगाणा येथेही जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील बिल्लोळी येथेही ४८ मिलिमीटर पाऊस पडला. तर भोकरदन, भोकर, कळंब, वडवणी येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. विदर्भातील बुलढाणा येथे ५५.४ मिलिमीटर पाऊस पडला. तर आमगाव, नागपूर, मोहाडी, मंगळूरपीर, रिसोड येथेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी कोसळल्या.  भिवडी शिवारात पावसाचा थरार भिवडी (ता. सासवड) गावात ढगफुटीने होत्याचे नव्हत केले. या ठिकाणी नाल्याला आलेल्या पुराने तीन जण वाहून गेले. यात गजराबाई सुदाम खुमणे (वय ६०), छकुली अनंत खुमणे (वय २२) यांच्यासह एका इसमाचा समावेश आहे. शेतशिवारात पूर्णत: नुकसान झाले आहे. महाभयंकर पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले. काढणीला आलेल्या भाताच्या तालीच्या ताली वाहून गेल्या. विहिरी बुजल्या. १०० हून अधिक लाइटचे पोल, डीपी मोडले. एकट्या भिवडी शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलिस पाटील अक्षय शिंदे यांनी दिली. आमच्या वडीलधाऱ्यांनी सुद्धा असा महाभयंकर पाऊस कधी पाहिला नाही, असे सांगिल्याचे शिंदे म्हणाले.  

गुरुवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत हवामान विभाग)  कोकण ः कुलाबा १७.८, डडाणू ४६.७, जव्हार २५, मोखेडा १४.८, तलासरी २०, अलिंबाग १८.५, मानगाव ३०, माथेरान १७.७, मुरूड ३२, पेण ४०.२, पोलादपूर ३१, रोहा १०, सुधागडपाली ८७, तला २०, उरण २१, खेड २८, मंडणगड १८, संगमेश्वर देवरूख ३८, वेंगुर्ला २५.८, शहापूर १५.

मध्य महाराष्ट्र ः पारनेर २९, पाथर्डी २९, राहाता ९९, संगमनेर २७, श्रीरामपूर ७४, धुळे १६, साक्री २१, शिरूर ६६, सिंदखेडा ४४, अंमळनेर १९, बोदवड ४७,  चाळीसगाव २६, दहिगाव ३९.६, धरणगाव, एरंडोल २२, जामनेर ३६, मुक्ताईनगर ५९, पाचोरा २१, पारोळा २७, रावेर १५, यावल १४.१, हातकणंगले २२, पन्हाळा १६, , नाशिक १९, दिंडोरी ६८, हरसूल २९.६, इगतपुरी २५, कळवण ३१, नांदगाव १६, निफाड १७.८, नाशिक ३६.४, सिन्नर ४१, सुरगाना ७१.३, त्र्यंबकेश्वर १७, येवला ५२, भोर २१, जुन्रर १८, पौड ४४, पुरंदर १४३, शिरूर २०, पुणे ५३.१, वडगाव मावळ २४, वेल्हे ५७, कडेगाव, विटा १६, दहीवडी मान १०, जावळीमेढा ४३, कऱ्हाड २१, खंडाळा १४.८, महाबळेश्वर ११.७, पाटण ४०, फलटण १३, वाई २४.८, अक्कलकोट १०, बार्शी १४, माढा ११.६, मोहोळ २७.४, सांगोला ३७, सोलापूर ४२.४.

 मराठवाडा ः औरंगाबाद २९, कन्नड २०, खुलताबाद १६, फुलंब्री २१, सिल्लोड ३२, सोयगाव १५, केज १२, परळीवैजनाथ १६, वडवणी ३५, सेनगाव ३०,  बदनापूर २९, भोकरदन ३४, घनसांगवी १८, रेनापूर २०, भोकर ३३, बिल्लोली ४८, लोहा १५, मुदखेड २६, कळंब ३७, परांडा ३०, गंगाखेड १५, पुर्णा २२.

विदर्भ ः अकोला २९.३, अकोट १७.३, बाळापूर १९.२, बार्शीटाकळी २४.३, मूर्तिजापूर २९.५, तेल्हारा ३०.६, अमरावती ३५.७, चांदूरबाजार २१.३, चिखलदा २७.४, दर्यापूर २६.८, धारनी १६.८, भंडारा १५.२, लाखंदूर ३२.४, लाखनी १९.२, मोहाडी ३२.८, पौनी २८.२, तुमसर २१.२, बुलढाणा ५५.४, चिखली २३.९, खामगाव ३६.२, लोणार ३०.४, मलकापूर २६.३, मेहकर २७.३, मोताळा १८.६, नांदुरा २१.९, संग्रामपूर ३९.४, शेगावा १८.४, सिंदखेडराजा ३०.१, भद्रावती १६.३, चिमूर २८.८, गडचिरोली २३.५, मुलचेरा १४, आमगाव ४९.४, अर्जुनीमोरगाव २०.१, देवरी २२, गोंदिया २८.३, गोरेगाव १८.५, सडकअर्जनी २०.८, सालेकसा २८.८, तिरोरा २०.७,  हिंगणा २०, कळंमेश्वर १६.३, कामठी २४.२, कुही २८.२, नागपूर ४८.१, रामटेक २२.२, सावनेर १९.४, उमरेर १६.,२, आष्टी २७.८, खांरगा १६.५, करंजलाड ३४.५, मालेगाव २३.५, मंगळूरपीर ४६.७, मानोरा २०.८, रिसोड ३७.५, वाशीम ३४.१, पुसद २०.३. 

पावसाची तुफान ‘बॅटिंग’

  •   मुळा, कऱ्हा, गोदावरी, भिमा नद्यांना पूर 
  •   वऱ्हाडात सर्वदूर मध्यम ते जोरदार पाऊस
  •   मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
  •   सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागात पावसाने दिलासा
  •   सोलापूर जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची हजेरी
  •   रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, मंडणगड तालुक्यात पिकांना फटका
  •   सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली
  •   जळगाव जिल्ह्यातील भवरखेडा येथे अंगावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू
  •   मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात १३ व्यक्तींचा मृत्यू, ६१ जनावरे दगावली
  • धरणातून होणारा विसर्ग (क्युसेकमध्ये)

    धरण  विसर्ग
    नाझरे   ११,००० 
    वीर  २३,३८५
    गंगापूर १७१३
    दारणा   ५१२०
    पालखेड   ७८७५
    उजनी   ५१,६०० 
    जायकवाडी  ३५,००० 
    खडकवासला  १३,९८१
    नांदूर मध्यमेश्वर ५०,७४०

    पावसाची शक्यता दक्षिण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अरबी समुद्र या परिसरात चक्रावाताची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे आज (ता.२७) आणि उद्या (ता.२८) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com