कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस
पुणे : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, मावळ, मुळशीसह पश्चिम भागातील काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा येथे सर्वाधिक २८५ मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. दमदार पावसाने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

रविवारी (ता. १५) दुपारपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. रात्री पावसाचा जोर अधिक वाढला होता. साेमवारीही सकाळपासून दणक्यात पाऊस पडत होता. मुळशीतील माले, मुठे, भोरमधील भोलावडे, मावळातील काले, कार्ला, लोणावळा, खडकाळा, तर जुन्नर तालुक्यात राजूर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. इतर भागातही दमदार पाऊस पडला. पावसाची प्रतीक्षा असलेल्या पूर्व भागातील दौंड, पुरंदर, शिरूर या तालुक्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मावळात पडत असलेल्या पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. तसेच वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार अाहे.
सोमवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मि.मी.) : पौड ९६, घोटावडे ७४, माले ११६, मुठे १०७, पिरंगुट ७२, भोलावडे १४०, आंबवडे ५१, निगुडघर ९२, वडगाव मावळ ६५, तळेगाव ५५, काले १५४, कार्ला १५६, खडकाळा १०१, लोणावळा २८५, शिवणे ५९, पानशेत ९०, विंझर ५५, राजूर १४५, डिंगोरे ७६, वाडा ५८, कुडे ८८, पाईट ६०, आंबेगाव ६०.
- 1 of 581
- ››