पुण्यात अतिवृष्टी; सात मृत्युमुखी, शाळा, महाविद्यालयांना सुटी

पुण्यात अतिवृष्टी; सात मृत्युमुखी, शाळा, महाविद्यालयांना सुटी
पुण्यात अतिवृष्टी; सात मृत्युमुखी, शाळा, महाविद्यालयांना सुटी

 पुणे : शहर व उपनगरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज (गुरुवार) सुटी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाही करण्यात आल्याची माहिती दिली. पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री मात्र ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.  शहरात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात ९४ मिलिमीटर पावसाची नोंद २०११ मध्ये झाली होती. आठ वर्षांनंतर एका रात्रीत ८७.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची घटना पुण्यात घडली. मंगळवारी (ता. २४) सकाळी साडेआठ ते बुधवारी (ता. २५) सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये हा पाऊस कोसळला. पुण्यात या वर्षी १ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरदरम्यान ३२६.४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यापैकी १४३.२ मिलिमीटर पाऊस अवघ्या ४८ तासांमध्ये पडला. यापूर्वी दहा वर्षांत इतक्‍या कमी वेळेत एवढा पाऊस पडल्याची हवामान खात्यात नोंद झालेली नाही. सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत काळे ढग आकाशात दाटून येतात. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते गडद काळ्या रंगांचे होऊन विजांचा कडकडाट होऊ लागतो आणि जोरदार पावसाला सुरवात होते, असे चित्र दोन दिवस पुण्यात दिसत आहे, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

पुण्यात ढगफुटीने सात जणांचा मृत्यू; मोठे नुकसान पद्मावतीजवळील अरणेश्वर येथील टांगेवाले कॉलनीत ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने भिंत कोसळली. या दुर्घटनेत रोहित भरत आमले (वय १३), संतोष कदम (वय ५५), सौंदलीकर (वय ३२) आणि त्यांचा ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, शिंदे हायस्कुलनजीक नाल्यात १ महिलेचा मृत्यू झाला आहे.

शिवापूरजवळ ओढ्याला पूर अनेक जण गेले वाहून; तिघांचे मृतदेह हाती खेड-शिवापूर : बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचा फटका खेड-शिवापूर गावाला बसला आहे. येथील ओढ्याला आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेल्याची भिती नागरीक व्यक्त करत आहेत. तर फक्त तीन मृतदेह आत्तापर्यंत हाती लागल्याचे पोलिस सांगत आहेत.  सकाळी आठ वाजेपर्यंत तीन मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरीक आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरु आहे.

पुण्यातील पावसात महापालिकेच्या ठेकेदाराचाच मृत्यू  सिंहगड रस्त्याजवळील वीर बाजी पासलकर पुलावरून एक कार वाहून गेल्याने, कारमधील महापालिकेच्या ठेकेदाराचाच मृत्यू झाला आहे.  महापालिकेचे ठेकेदार असलेले किशोर गिरमे यांची कार पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. इतरही काही जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com