रत्नागिरीत मुसळधार पाऊस

पाऊस
पाऊस

रत्नागिरी: मुसळधार पावसाने रत्नागिरीत कहर केला असून, ठिकठिकाणी पाणी भरले आहे. तालुक्यातील केळेये-मजगाव पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. रत्नागिरी शहरातही पावसाचे ठिकठिकाणी साचले आहे. गणपतीपुळे-मालगुंड येथे घरात पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. धामणसे-ओरी आणि केळ्ये येथे रस्ता खचल्याने वाहतूक खंडित झाली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९९.८९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १८, दापोली १०१, खेड १८, गुहागर ११६, चिपळूण १९, संगमेश्‍वर ४७, रत्नागिरी २१२, लांजा ११७, राजापूर २५१ मि.मी.ची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोमवारपासून पावसाने कहर केला आहे. त्याचा सर्वाधिक फटका गणपतीपुळे - मालगुंड परिसराला बसला आहे. मालगुंड रहाटाघर येथे असणाऱ्या तीन घरांमध्ये पाणी शिरले असून, पूरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. घरातील वस्तूदेखील वाहून गेल्या आहेत. श्‍याम सुर्वे, रश्मी पाटील आणि हरिश्चंद्र मयेकर यांच्या घरात रात्री पाणी शिरले होते.  मंगळवारीही पाऊस अधूनमधून पडत राहिल्यामुळे पाणी ओसरलेले नाही. त्यामुळे रात्रभर या पाण्यात इथल्या लोकांना राहावे लागले. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गणपतीपुळे खाडीचे पाणी पात्राबाहेर आल्याने सुर्वे यांच्या घरात पाणी शिरले. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरून असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील भिंत कोसळून १५ लाखांचे नुकसान झाले आहे. भिंतीची माती, दगड शेजारील दुकानावर कोसळली आहे. हा मार्ग सध्या बंद झाला आहे. या पावसामुळे सोमवारी रात्री मिरजोळे-पाटीलवाडी येथे पाणी भरले होते. शिळकडे जाणार मार्गही बंद झाला.  पावसामुळे केळेये येथे नदीचे पाणी पुलावरून वाहत होते. गावात जाणारे ग्रामस्थ रात्रभर अडकून पडले होते. भांडरपुळे येथेही पाणी भरल्याने गणपतीपुळेकडे जाणार मार्ग बंद झाला होता. पावसाचा जोर ओसरल्यानंतर विस्कळित झालेले जनजीवन पूर्वपदावर आले. कुवारबाव येथेही मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. केळ्ये येथील रस्ता खचला असून, वाहुकीत अडथळा निर्माण झाला आहे. धामणसे-ओरी येथे रस्तावर माती आली असून, तो मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com