agriculture news in Marathi heavy rain in satara district Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, सातारा तालुक्याला वादळी पावसाने बुधवारी (ता.२९) दुपारी झोडपून काढले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून आंबा, कलींगड, केळीसह अन्य फळांचे मोठे नुकसान झाले.

सातारा: कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, सातारा तालुक्याला वादळी पावसाने बुधवारी (ता.२९) दुपारी झोडपून काढले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून आंबा, कलींगड, केळीसह अन्य फळांचे मोठे नुकसान झाले. काढणी केलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. 

कऱ्हाड शहरासह तालुक्याला बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना शेतात सुरु असलेली मशागतीची कामे बंद करावी लागली. पावसापुर्वी आलेल्या वादळी वाऱ्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये आंबा, केळी, कलींगडासह टोमॅटो, काकडीचेही मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके भिजुनही मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर गवताच्या गंजी, काढणी झालेले धान्यही भिजुन नुकसान झाले. 

मसूर विभागात मसूरसह निगडी, किवळ, चिखली, हेळगाव, पाडळी भागात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. रिसवड, अंतवडी भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले. निगडी, किवळला वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून आडवी पडली. आडसाली ऊस आडावा झाला. पाटण तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. तासभर पडलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी केले. 

खरीप पुर्व मशागतीच्या कामांत व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे घरी परतावे लागले. पावसापुर्वी वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहिले. त्यानंतर पावसास प्रारंभ झाला. अर्धा तास मुसळधार पाऊस पडत होता. तारळे विभागातील जंगलवाडी, खडकवाडी, फडतरवाडी, घोट, ढोरोशी, मरळोशी, जळव, मुरुड, बांबवडे आदी गावांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपुन काढले. 

पावसाने घोटच्या कोरड्या पडलेल्या बांधाऱ्यात पाणी साठून बंधारा वाहू लागला आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने लोकांची एकवेळ भीतीने गाळण उडाली होती. अचानक आलेल्या या पावसाने लोकांची तारांबळ उडालीच शिवाय मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. एकूणच पावसात विभागात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावांना पावसाने झोडपले. शिरंबे येथील काही घरांवरील पत्रे उडाले. तालुक्याच्या दक्षिण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्धातास पावसाचा जोर होता. वादळामुळे शिरंबे येथे नुकसान झाले. सातारा व फलटण तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...