सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

सातारा पुर
सातारा पुर

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत एकूण सरासरी ५३.६७ मिलिमीटर पावसाची नोंद  झाली. पश्चिम भागातील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कराड, वाई या तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.  या तालुक्यातील नद्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी, वेण्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोरेगाव, खटाव, खंडाळा या तालुक्यांतही दमदार पाऊस सुरू आहे. माण व फलटण तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यामुळे येथील पिकांना जीवदान मिळणार असून, पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.  पिके पाण्याखाली  जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाचे असेच प्रमाण राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)  सातारा-  ७२.३७, जावळी- १११.२७,  पाटण- ६९.८२,  कराड- ५३.८५, कोरेगाव- २९.६७, खटाव- १६.९७, माण-  ७.१४, फलटण- ६.२२, खंडाळा- १४.५०, वाई- २७.५१, महाबळेश्वर- २७५.८५.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com