तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

पाऊस
पाऊस

पुणे ः गेले दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता.२३) सायंकाळी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मंगळवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील बीड येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस पडला; तर पुणे, कोल्हापूर, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, नागपूर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा झाला; तर तेल्हारा, संग्रामपूर येथे विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडल्याने नद्या, नाले ओसंडून वाहू वाहत असून येराळा, बाणगंगा, माणगंगा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.  अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात हवामान ढगाळ होते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाडा व खान्देशातही ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. विदर्भातील वडवनी, धर्माबाद, शिरूर अनंतपाल, वाशी, परांडा, देगलूर, निलंगा येथेही जोरदार पाऊस पडला; तर माजलगाव, शिरूरकासार, वसमत, अहमदपूर, रेणापूर, बिल्लोली, किनवट, मुखेड, गंगाखेड येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.  मंगळवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत हवामान विभाग) कोकण ः संगमेश्वर देवरूख १३, मध्य महाराष्ट्र ः जामखेड ६१, कर्जत १२, पारनेर १२, चाळीसगाव २६, हातकणंगले १२, अक्कलकुवा ४१, चांदवड ३३, देवळा २२, कळवण ८७, मुल्हेर १५.५, सटाणा ३७, बारामती २२.४, पुणे ५५.९, मावळ ३३, तळेगाव ८३, केशवनगर १७, कोथरूड १३, खडकवासला १३, थेऊर ३३, उरुळी कांचन १५, भोसरी १५, चिंचवड १४, कळस १४, हडपसर ३५, घोटावडे १७, वेळू ४२, खडकाळा २३ राजूर ३६, आळंदी ४९, कन्हेरसर ४२, चाकण २३, रांजणगाव ४०, टाकळी १३, माळेगाव २७, बारामती १८, पणदरे १८, बावडा येथे ५३, यवत ३२, आटपाडी १३, जत १७.१, कडेगाव ४८, मिरज १२, पलूस ११, तासगाव ३३, विटा १८, दहीवडी ३८, कऱ्हाड ५५, खटाव २९.४, कोरेगाव ३५, पाटण ३६, फलटण ४८, अक्कलकोट २६, माढा ११०, माळशिरस ४४, मराठवाडा ः बीड १४०, माजलगाव २०, शिरूरकासार २४, वडवनी ५२, वसमत १०, अहमदपूर १३, निलंगा ३१, रेणापूर १५, शिरूर अनंतपाल ४०, बिल्लोली १४, देगलूर २८, धर्माबाद ३५, किनवट ११, मुखेड १९, परांडा ३५, वाशी ३३, गंगाखेड १८, विदर्भ ः इटापल्ली १०, कुरखेडा १४.८, चार्मोशी ८.५, कामठी १६.४, मौदा ६०.६, आष्टी ११.३, देवळी १४.३, हिंगणघाट १८.७, खारंगा ११.७, वर्धा १६.४, करंजफेन १२.१, मालेगाव १७.१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com