राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस 

राज्यातील पावसाचा प्रभाव कमी झाल्यानंतर रविवारी (ता.१८) पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहे.
rain loss
rain loss

पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी झाल्यानंतर रविवारी (ता.१८) पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहे. आधीच सोयाबीन, कांदा, कापूस, ऊस, भाजीपाला, फळांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने आता सगळच हातातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 

कोकण व मध्य महाराष्ट्रात प्रमुख नद्यांना निर्माण झालेली पुराची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पावसाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पालघर जिल्ह्यात दुपारपर्यंत ऊन पडले असले तरी दुपारनंतर घाटमाथ्यासह अनेक भागात पावसाने चांगलाच जोर धरला होता. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, नाशिक भागात तुरळक ठिकाणी हलका पडला. पुणे शहरासह शिरूर, दौंड, पुरंदर, भोर, मुळशी, मावळ, खेड तालुक्यात पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या. 

मराठवाडा व विदर्भात पाऊस नसल्याने कापूस वेचणी, सोयाबीन काढणीचे कामे सुरु आहेत. रब्बी हंगामात काही तरी पेरणी करता येईल या अपेक्षेने शेतातील नुकसान झालेले पिके काढून टाकण्यासाठी शेतात व्यस्त आहेत. कापसाचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी झालेला खर्चही निघण्याची शक्यता कमी झाली आहे.  रविवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटर ः स्त्रोतः हवामान विभाग  मध्य महाराष्ट्र : जळगाव १६, देवळा ७७.६, कळवण १९, मुल्हेर १२, सटाना १७९, सुरगाना २६.  मराठवाडा ः निलंगा ३०, हदगाव १६, हिमायतनगर २८.  विदर्भ ः नांदगावकाझी ४३, लोणार २९.५, भामरागड १७, मालेगाव ४८, रिसोड १८.८, पुसद ६२.५.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com