agriculture news in Marathi, heavy rain in several places in State, Maharashtra | Agrowon

राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे  ः राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुणे शहराला बुधावारी (ता. १०) वादळी वाऱ्यांसह पावासाने अक्षरश झोडपून काढले. तर सोलापूर जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला. गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

पुणे  ः राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुणे शहराला बुधावारी (ता. १०) वादळी वाऱ्यांसह पावासाने अक्षरश झोडपून काढले. तर सोलापूर जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला. गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

ऑक्टोबर हीट वाढल्याने वातावरणात सकाळपासून उकाड्यात वाढ होत आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हवामान ढगाळ होते. बुधवारी (ता. ९) सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर अचानक ढग जमा झाल्याने दुपारी पाचनंतर राज्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडला असून, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी मात्र पावसाची उघडीप होती.

पावसाने दिलेली उघडीप आणि वाढलेला उन्हाच्या चटक्यामुळे वातावरणात उकाड्यात वाढ झाल्याने अनेक भागांतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर डहाणू, सातारा  येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात घट झाली असून, जळगाव, मालेगाव, अलिबाग, औरंगाबाद, बीड, गोंदिया, वर्धा येथील कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली होती.

कोकणातील पेण येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर भिवंडी, सुधागड पाली, रोहा, वाकवली, अंबरनाथ, पनवेल, खेड येथेही जोरदार पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, काही भागांत हवामान ढगाळ होते. मध्य महाराष्ट्रातील पुण्यातील कोथरूड येथे सर्वाधिक ७४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली होती. तर काही ठिकाणी रस्ते भरून वाहत होती.

पंढरपूर येथे ५५ मिलिमीटर पाऊस पडला. तर जेऊर, माळशिरस, कारेगाव, मंगळवेढा, सांगोला, सोलापूर, तासगाव, गगनबावडा येथेही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील उमरगा, लोहारा, मुखेड येथेही हलका स्वरूपाच्या सरी बरसल्या असून, अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती. विदर्भातही देऊळगाव राजा येथे २६. ९ मिलिमीटर पाऊस पडला असून भामरागड, सिंरोचा येथेही हलका पाऊस पडला.

गुरुवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये) (स्रोतः हवामान विभाग)
कोकण ः मोखेडा ११.६, विक्रमगड १३, अलिबाग २७, महाड २०, पनवेल ३८.८, पेण ६०, रोहा ४७, सुधागड पाली ५८, तळा १४, खेड ३८, लांजा ११, रत्नागिरी १५, वाकवली ३०.२, दोडामार्ग २१, वैभववाडी २०, अंबरनाथ २५.२, भिवंडी ५०, कल्याण ११, मुरबाड १५, शहापूर २०, उल्हासनगर १२,
मध्य महाराष्ट्र ः आजरा १०, चांदगड ११, गगनबावडा ३७, पन्हाळा १५, भोर ३८, जुन्नर २०, पौड १२, पुणे शहर २१.३, वेल्हे १४, कडेगाव २०, कवठेमहाकाळ ६७, तासगाव २२, विटा १५, वाळवा इस्लामपूर १९, कराड १०, खंडाळा १४, कारेगाव ३६, पाटण २९, सातारा १५.६, वाई १८, अक्कलकोट २८, जेऊर ४२, माळशिरस ३३, मंगळवेढा ४२, मोहोळ १०.२, पंढरपूर ५५, सांगोला ४२, सोलापूर ३२.२,  
मराठवाडा ः उमरगा ३५, लोहारा ७, मुखेड १४,  
विदर्भ ः देऊळगाव राजा २६.९, भामरागड १८.५, सिरोंचा ८

परतीच्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू
परतीच्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. बुधवारी (ता. ९) परतीच्या प्रवासाला सुरवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने राजस्थान व पंजाबचा बराचसा भाग, हरियाना, चंडीगड, दिल्लीचा संपूर्ण भाग तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. शनिवार (ता. १२)पर्यंत संपूर्ण वायव्य भारत, मध्य व पूर्व भारताच्या काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. उत्तर भारतातून मॉन्सून परत फिरल्याने हवामान कोरडे होऊन तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानातील चुरू येथे सर्वाधिक ३६.७ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. यातच महाराष्ट्रात अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 
अरबी समुद्र, कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र या परिसरात समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. परतीच्या पावसाचा वेगाने प्रवास सुरू झाला असून, राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार...
तेरा बियाणे कंपन्यांवर अखेर फौजदारी...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे...
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...
वाढत्या तणावात कापसाच्या होताहेत वातीचालू हंगामातील कापूस वेचणी दोन ते अडीच महिन्यांत...
बाजारपेठा काबीज करण्याची हीच संधीको रोनाच्या वैश्‍विक संकटाशी लढताना जगातील अनेक ...
जिल्हा बॅंकांची थकबाकी २३ हजार कोटींवरसोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी...
कृषी पदविका, तंत्रनिकेतनच्या अंतिम...पुणे  : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन...
भारतीय अन्न महामंडळाबाबतचा शांता कुमार...पुणे : भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) उपयुक्तता...
पंधरा हजार कोटींची शेतीमाल निर्यात...पुणे : जागतिक कृषी उत्पादनाच्या नकाशावर बलाढ्य...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोरपुणे  : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी...
शेतकऱ्यांनी घोषणापत्र न दिल्यास बँका...पुणे  : खरीप विमा योजनेत सहभागी होण्यासाठी...