agriculture news in Marathi heavy rain in several places in state Maharashtra | Agrowon

राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरी

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पडत असला तरी अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. 

पुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पडत असला तरी अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. काही ठिकाणी अति पावसामुळे भाजीपाला पिके सडली आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे कामे सुरू झाले आहेत.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मालवण येथे सर्वाधिक ७४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात साचले. सांगलीतील आटपाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. डाळिंब शेतात पाणी साचल्याने फळकुज होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने धोक्यात आलेली खरिपाची पिके ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहेत.

मराठवाड्यातील बीड लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा जोर बऱ्यापैकी होता. तर अहमदपूर येथे सर्वाधिक १३१ मिलिमीटर पाऊस पडला असून पिके आडवी झाली. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

शनिवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)
कोकण : कुडाळ ४५, वेंगुर्ला ५४.८, शहापूर ५८, मध्य महाराष्ट्र : ओझरखेडा ३१.८, माळशिरस ९९. मराठवाडा : अंबाजोगाई ३१, माजलगाव ४५, रेणापूर ५१, देगलूर ४८, 
उस्मानाबाद ४६.१, परांडा ४५.विदर्भ : चंद्रपूर ४७.८, देसाईगंजवडसा ३४, मारेगाव २७.३.


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...