राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहे. घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहे.
rain flood
rain flood

पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहे. घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून धरणात आवक सुरू झाली आहे. चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झाली आहे. 

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही बऱ्यापैकी सरी कोसळत आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असल्याने अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे. मात्र, तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे या भागातील तलावात व धरणात नवीन पाणी येऊ लागले आहे. येत्या काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास धरणातील पाणीपातळीत वाढ होईल. 

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी विदर्भाच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. जोरदार पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कापूस अशा पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. 

मध्य महाराष्ट्रात प्रभाव कमी  नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील भागांतही पावसाचा जोर कमी झाली आहे. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या पावसाच्या प्रभाव अधिक आहे. त्यामुळे भात खाचरात पाणी साठले जाऊ लागले असून भात लागवडीच्या कामे वेगाने सुरू झाली आहे. भात रोपवाटिकेच्या कामांनाही चांगलाच वेग आला आहे. मुळशी, वडिवळे, गुंजवणी, वरसगाव, पानशेत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. 

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार  बीड, हिंगोली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. इतर जिल्ह्यांत अंशतः कडक उन्हासह, ढगाळ वातावरण होते. बीड जिल्ह्यातील वाडवाणीमधील शिंदफणा नदीला पूर आला होता. तसेच नांदेडमधील विष्णुपुरी धरणांतही चांगला पाणीसाठा झाल्याने जवळपास भरले आहे. 

राज्यात रविवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्त्रोत ः हवामान विभाग  कोकण : सांताक्रुझ ७४, कर्जत ४८.६, खालापूर ५६, महाड ४२, माथेरान ९१, म्हसळा ४०, पनवेल ६०.४, पेण ४५, पोलादपूर ५०, रोहा ६२, तळा ६६, दापोली ६०, गुहागर ३९, हर्णे ७७.७, खेड ६८, लांजा ८२, मंडणगड ९४, राजापूर ८५, देवगड ५४, दोडामार्ग ४४, कणकवली ९५, सावंतवाडी ९२, वैभववाडी ७५, कल्याण ४३, उल्हासनगर ५३.  मध्य महाराष्ट्र : शाहूवाडी ३९, मालेगाव ३५, लोणावळा कृषी ३८.१, महाबळेश्वर ४२.४,  मराठवाडा : केज ६५, माजलगाव ५०, वाडवणी ३२, औंढा नागनाथ ३२, सेनगाव ३०, मंठा ५४, परतूर ८१, औसा ३४, निलंगा ६९, शिरूर अनंतपाळ ३०, कळंब ३१, जिंतूर ४८, मानवत ३०, पाथरी ३४, सोनपेठ २७.  विदर्भ : पुसद ३७.७.  शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे  रत्नागिरी १५०.२, संगमेश्वर १२९, माणगाव ११०, सेलू १०२.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com