agriculture news in Marathi heavy rain in several places in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जून 2021

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहे. घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहे. 

पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहे. घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून धरणात आवक सुरू झाली आहे. चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झाली आहे. 

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही बऱ्यापैकी सरी कोसळत आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असल्याने अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे. मात्र, तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे या भागातील तलावात व धरणात नवीन पाणी येऊ लागले आहे. येत्या काळात आणखी चांगला पाऊस झाल्यास धरणातील पाणीपातळीत वाढ होईल. 

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी विदर्भाच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. जोरदार पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कापूस अशा पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. 

मध्य महाराष्ट्रात प्रभाव कमी 
नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील भागांतही पावसाचा जोर कमी झाली आहे. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या पावसाच्या प्रभाव अधिक आहे. त्यामुळे भात खाचरात पाणी साठले जाऊ लागले असून भात लागवडीच्या कामे वेगाने सुरू झाली आहे. भात रोपवाटिकेच्या कामांनाही चांगलाच वेग आला आहे. मुळशी, वडिवळे, गुंजवणी, वरसगाव, पानशेत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. 

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार 
बीड, हिंगोली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. इतर जिल्ह्यांत अंशतः कडक उन्हासह, ढगाळ वातावरण होते. बीड जिल्ह्यातील वाडवाणीमधील शिंदफणा नदीला पूर आला होता. तसेच नांदेडमधील विष्णुपुरी धरणांतही चांगला पाणीसाठा झाल्याने जवळपास भरले आहे. 

राज्यात रविवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटर) : स्त्रोत ः हवामान विभाग 
कोकण : सांताक्रुझ ७४, कर्जत ४८.६, खालापूर ५६, महाड ४२, माथेरान ९१, म्हसळा ४०, पनवेल ६०.४, पेण ४५, पोलादपूर ५०, रोहा ६२, तळा ६६, दापोली ६०, गुहागर ३९, हर्णे ७७.७, खेड ६८, लांजा ८२, मंडणगड ९४, राजापूर ८५, देवगड ५४, दोडामार्ग ४४, कणकवली ९५, सावंतवाडी ९२, वैभववाडी ७५, कल्याण ४३, उल्हासनगर ५३. 
मध्य महाराष्ट्र : शाहूवाडी ३९, मालेगाव ३५, लोणावळा कृषी ३८.१, महाबळेश्वर ४२.४, 
मराठवाडा : केज ६५, माजलगाव ५०, वाडवणी ३२, औंढा नागनाथ ३२, सेनगाव ३०, मंठा ५४, परतूर ८१, औसा ३४, निलंगा ६९, शिरूर अनंतपाळ ३०, कळंब ३१, जिंतूर ४८, मानवत ३०, पाथरी ३४, सोनपेठ २७. 
विदर्भ : पुसद ३७.७. 

शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे 
रत्नागिरी १५०.२, संगमेश्वर १२९, माणगाव ११०, सेलू १०२. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...