राज्यात ठिकठिकाणी मुसळधार

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडत आहे.
rain flood
rain flood

पुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडत आहे. उर्वरित भागांत अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.  रत्नागिरीमधील चिपळूण येथे सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या जोरदार पावसामुळे भात खाचरे भरून वाहत असून, नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमधील एक मध्यम व नऊ लहान प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. तर १४ प्रकल्प ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा येथे सर्वाधिक १४९ मिलिमीटर पाऊस पडल्याचे नोंदविले गेले. पुणे जिल्ह्यातही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगलीच संततधार सुरू आहे. नगर, नाशिक, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतही पावसाचा अधूनमधून शिडकावा होत असून खानदेशात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात उघडीप दिली आहे. 

विदर्भात तुरळक सरी  विदर्भातील भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. कोर्ची येथे ४२.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर कुरखेडा, बाभूळगाव, देवळी, हिंगणघाट परिसरांत पावसाच्या बऱ्यापैकी सरी कोसळल्या. 

शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे :  कर्जत ११८.४, म्हसळा १२१.४, श्रीवर्धन १६३, सुधागडपाली १७०, दापोली १७५, गुहागर १५५, हर्णे १६६, खेड १६५, लांजा १०८, मंडणगड १४६, गगणबावडा १४९, लोणावळा कृषी १५९.३, महाबळेश्‍वर १८५.३.  राज्यात शनिवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यत मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटर : स्रोत - हवामान विभाग  कोकण : खालापूर ७२, महाड ६७, माणगाव ६४, माथेरान २१.४, मुरूड ९४, पनवेल ३९.२, पेण ७८, पोलादपूर ६७, रोहा ८४, तळा ७९, उरण ३६, राजापूर ९४, रत्नागिरी ८३, संगमेश्‍वर ९२, दोडामार्ग ८३, कणकवली ६०, कुडाळ ५६, मालवण ७०, सावंतवाडी ७६.२, वैभववाडी ७४, ठाणे ४०, उल्हासनगर ३५. 

मध्य महाराष्ट्र : अकोले ३०, आजरा ७४, चंदगड ८८, गडहिंग्लज ४२, करवीर १.४, राधानगरी ९५, शाहूवाडी ६८, शिरोळ ३०, इगतपुरी ७१, घोडेगाव ३९, भोर ४४, राजगुरूनगर ४१, पौड ९५, पुणे ३८.७, वडगाव मावळ ५५.४, वेल्हे ५३, सातारा ३७.६. 

विदर्भ : लाखंदूर २८, चिमूर २४.४, नागभिड २५.६, कोर्ची ४२.५, कुरखेडा ३९.९, देवळी २६.४, हिंगणघाट २५, बाभूळगाव ३०.६. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com