agriculture news in Marathi heavy rain in several places in state state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडत आहे. 

पुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडत आहे. उर्वरित भागांत अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. 

रत्नागिरीमधील चिपळूण येथे सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या जोरदार पावसामुळे भात खाचरे भरून वाहत असून, नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमधील एक मध्यम व नऊ लहान प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. तर १४ प्रकल्प ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला आहे.

कोल्हापुरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा येथे सर्वाधिक १४९ मिलिमीटर पाऊस पडल्याचे नोंदविले गेले. पुणे जिल्ह्यातही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगलीच संततधार सुरू आहे. नगर, नाशिक, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतही पावसाचा अधूनमधून शिडकावा होत असून खानदेशात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात उघडीप दिली आहे. 

विदर्भात तुरळक सरी 
विदर्भातील भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. कोर्ची येथे ४२.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर कुरखेडा, बाभूळगाव, देवळी, हिंगणघाट परिसरांत पावसाच्या बऱ्यापैकी सरी कोसळल्या. 

शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे : 
कर्जत ११८.४, म्हसळा १२१.४, श्रीवर्धन १६३, सुधागडपाली १७०, दापोली १७५, गुहागर १५५, हर्णे १६६, खेड १६५, लांजा १०८, मंडणगड १४६, गगणबावडा १४९, लोणावळा कृषी १५९.३, महाबळेश्‍वर १८५.३. 

राज्यात शनिवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यत मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटर : स्रोत - हवामान विभाग 
कोकण : खालापूर ७२, महाड ६७, माणगाव ६४, माथेरान २१.४, मुरूड ९४, पनवेल ३९.२, पेण ७८, पोलादपूर ६७, रोहा ८४, तळा ७९, उरण ३६, राजापूर ९४, रत्नागिरी ८३, संगमेश्‍वर ९२, दोडामार्ग ८३, कणकवली ६०, कुडाळ ५६, मालवण ७०, सावंतवाडी ७६.२, वैभववाडी ७४, ठाणे ४०, उल्हासनगर ३५. 

मध्य महाराष्ट्र : अकोले ३०, आजरा ७४, चंदगड ८८, गडहिंग्लज ४२, करवीर १.४, राधानगरी ९५, शाहूवाडी ६८, शिरोळ ३०, इगतपुरी ७१, घोडेगाव ३९, भोर ४४, राजगुरूनगर ४१, पौड ९५, पुणे ३८.७, वडगाव मावळ ५५.४, वेल्हे ५३, सातारा ३७.६. 

विदर्भ : लाखंदूर २८, चिमूर २४.४, नागभिड २५.६, कोर्ची ४२.५, कुरखेडा ३९.९, देवळी २६.४, हिंगणघाट २५, बाभूळगाव ३०.६. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...