Agriculture news in Marathi Heavy rain showers at the wedding | Agrowon

वऱ्हाडात पावसाची दमदार हजेरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

यंदा मृग नक्षत्रातच पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी दिल्याने शेतीतील कामांनी वेग घेतला आहे. काही भागांत बुधवारी (ता. ९) पेरणीचेही काम शेतकऱ्यांनी हातात घेतल्याचे दिसून आहे.

अकोला ः यंदा मृग नक्षत्रातच पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी दिल्याने शेतीतील कामांनी वेग घेतला आहे. काही भागांत बुधवारी (ता. ९) पेरणीचेही काम शेतकऱ्यांनी हातात घेतल्याचे दिसून आहे. मंगळवारी (ता. ८) दुपारपासूनच पावसाचे वातावरण बनले होती. रात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त आहे.

यंदा मॉन्सूनचे आगमन जोमाने झाले आहे. मृग नक्षत्रात येणारा पाऊस हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या नक्षत्रातील पेरणी शेतकरी महत्त्वाची मानतात. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यात सरासरी ११.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पातूरमध्ये सात, बाळापूर चार, तेल्हारा पाच, अकोला ५.१ पाऊस नोंद झाला. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव, मेहकर, चिखली, लोणार, देऊळगावराजा, अशा विविध तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये दमदार पावसाने हजेरी दिली.

पेरणीला सुरुवात
पाऊस दमदार झाल्याने जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा हातात घेतली. बैलजोडीच्या साह्याने तिफणीने सोयाबीन, तूर, मूग, उडीद पेरणीसाठी शेतकरी सकाळपासूनच कामाला लागल्याचे दिसून आले.  या भागात प्री-मॉन्सून लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण बनलेले होते. आणखी दोन दिवसांत पाऊस झाल्यास सार्वत्रिक पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...