सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर वाढत असून जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद ९५ मि.मी. झाली. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांनी भातलावणीला सुरवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (ता. २७) रात्री संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यातील सर्वच नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी या चारही तालुक्यात अतिवृष्टी झाली. शुक्रवारी सकाळपासून देखील पावसाचा जोर कायम असून संततधार सुरू आहे.

चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व पावसात पेरणी केलेल्या भात रोपे लागवडीस सुरवात केली आहे. जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यानतंर तत्काळ पेरणी केली जाते. त्या गावांमधील भात रोपे लागवडीयोग्य झाली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून भातलावणीला सुरवात झाली आहे. शेतमळ्यांमध्ये पांरपरिक आणि आधुनिक पद्धतीने लागवड केली जात असल्याचे चित्र गावागावात पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com