agriculture news in Marathi, heavy rain in Sindhudurg, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; तिलारी नदी धोक्याच्या पातळीवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. तिलारी नदी धोक्याच्या पातळीनजीक पोचली आहे. त्यामुळे तिलारी नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील मांडकुली (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यावर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. तिलारी नदी धोक्याच्या पातळीनजीक पोचली आहे. त्यामुळे तिलारी नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील मांडकुली (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यावर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात शनिवारी दुपारनतंर मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीनाल्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत होते. पावसामुळे अनेक नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. दोडामार्ग तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत या तालुक्यात १६० मि. मी. पाऊस झाला. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

तिलारी धरणाचे चारही दरवाजे दीड मीटरने उघडले असून, सध्या धरणातून १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय पडणारा मुसळधार पाऊस यामुळे तिलारी नदीची पाणीपातळी धोक्यानजीक पोचली आहे. या नदीची धोक्याची पातळी ४३.६० मीटर असून सध्या नदीची पातळी ४१.६० इतकी आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे येथील लोकांचे मोठे नुकसान झाले होते. तीच भीती अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे.

जिल्ह्याच्या इतर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. बांधकाम विभागाने दरड हटवून हा मार्ग वाहतुकीस खुला केला. परंतु रविवारी सकाळी आठ वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील मांडुकली (ता. गगनबावडा) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडा घाट, राधानगरीमार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...