agriculture news in Marathi heavy rain in state Maharashtra | Agrowon

पावसाने पुन्हा दाणादाण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि वऱ्हाडातील काही भागांत शनिवारी (सायंकाळी) जोरदार पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आल्याने पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.

पुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि वऱ्हाडातील काही भागांत शनिवारी (सायंकाळी) जोरदार पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आल्याने पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीनला झाडावरच कोंब फुटले तर अनेक ठिकाणी कपाशी पीक पाण्याखाली गेले. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी ऊस आडवा झाला.  

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील बहुतांशी मंडळात पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे करपरा, दुधना, इंद्रायणी, पूर्णा नद्या तसेच ओढे, नाल्यांच्या पुराचे पाणी शेतातील पिकांमध्ये शिरले. त्यामुळे पिके आडवी झाली. पूर्णा नदीच्या पाण्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह भाजीपाला, फळे, पिकांची मोठे नुकसान झाले आहे.

सोयाबीनच्या शेंगा भिजून-भिजून त्यांना झाडावरच अंकुर फुटले आहेत. हिंगोली जिल्ह्यात ओढे, नाल्याचे पाणी शिरल्यामुळे ७०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी सोयाबीन, बाजरी, मका पिकांना फटका बसला. पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध ओलांडून पाणी वाहिले. तर काही ठिकाणी शेतातून माती वाहून गेली. सोंगणीला आलेले बाजरीचे पीक आडवे झाले. कपाशीचे बोंडे खराब होत असून द्राक्ष छाटण्या रखडल्या आहेत. नवीन कांदा लागवडीमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपे खराब होत आहेत.  

पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, बारामतीसह अनेक भागांत शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भाजीपाला पिकांना फटका बसला. तर, नगर जिल्ह्यातील नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव भागाला जोरदार पावसाने झोडपल्याने खरीप पिकांचे नुकसान केले. जिल्ह्यातील काही भागांत सध्या सोयाबीन सोंगणी सुरु आहे. शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजले.

नद्यांचे पाणी शिवारात
परभणी जिल्ह्यात करपरा, दुधना, इंद्रायणी, पूर्णा नद्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन, कपाशी, मका, हळद आणि तूर पिकाचे नुकसान झाले. भाजीपाला पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला. सोयाबीनच्या शेंगा सतत भिजून त्यांना झाडावरच अंकुर फुटले. हिंगोली जिल्ह्यात ओढे, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्यामुळे ७०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...