agriculture news in Marathi heavy rain in state Maharashtra | Agrowon

राज्यात अतिवृष्टीने दाणादाण 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 जुलै 2021

कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस कोसळला. धुवाधार झालेल्या पावसामुळे काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस कोसळला. धुवाधार झालेल्या पावसामुळे काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. चिपळूणमध्ये आभाळ फाटल्याने शहर जलमय होऊन मोठे नुकसान झाले. कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत पावसाने दणका दिला. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली. 

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरमध्येही सर्वदूर पाऊस पडल्याने कोकणातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. रत्नागिरीत ढगफुटीसारखे पावसाने थैमान घातले असून खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर जलमय झाले. नद्यांवरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले असून, गावांचा संपर्क तुटला. नदीकिनारी भागातील हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. रत्नागिरीत टेंभे येथे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक कुटुंबे पुरामध्ये अडकून पडली. रात्रभर झालेल्या ढगफुटीने वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला. चिपळूण शहरासह आजूबाजूची गावे जलमय झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बहुतांशी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. खारेपाटण शहरात पुराचे पाणी शिरले असून, अनेक दुकाने पाण्याखाली गेली. घरे, गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मध्य महाराष्ट्रात मुसळधार 
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत तब्बल ९.४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरण क्षेत्रातील कोयना ३४७, नवजा ४२७, महाबळेश्‍वर ४२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ६५ हजार क्युसेक पाण्याची आवक होती. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नद्यांचे पाणी वाढल्याने जिल्ह्यात अस्वस्थता वाढली आहे. कोल्हापूर शहरातील उपनगरांनाही ओढ्याच्या पुराचा तडाखा बसला. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने नद्या ओसंडून वाहत होत्या. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मुळशी धरणात चोवीस तासांत २.५९ टीएमसी पाणीसाठा नव्याने आला होता. नगरमधील अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर व रतनवाडीसह अन्य भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. रतनवाडी येथे २०७ मिलिमीटर, तर घाटघरला २१२, पांजरे २१० मि.मी. पावसाची नोंद झाली. जोरदार पावसाने भंडारदरा, मुळा व निळवंडे धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. नाशिकमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडल्याने धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची सर्वदूर संततधार सुरू आहे. सांगलीत गेले चार दिवस रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो आहे. 

मराठवाड्यात जोरदार पाऊस 
जालना, परभणी, नांदेड हे जिल्हे अक्षरश: पावसाच्या रडारवर होते. या तीन जिल्ह्यांसह लातूर, बीड, हिंगोली मिळून सहा जिल्ह्यांतील तब्बल ७७ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांतील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह तब्बल २४ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. पाकरपरा, दुधना, पूर्णा आदी प्रमुख नद्यांसह त्यांच्या उपनद्या तसेच ओढे, नाल्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, हळद आदींसह भाजीपाला, फळ पिके पाण्याखाली बुडाली. परभणी जिल्ह्यातील ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू आहे. या प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडून १२ हजार ४९२ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडून दोन हजार १४५ क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. 

विदर्भात सर्वदूर पाऊस 
अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात विक्रमी १६८ मि.मी. पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. मोर्णा तसेच इतर उपनद्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचेही प्रकार घडले. २६ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात २०२ मि.मी. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात ६६ मि.मी.चा अपवाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक हजेरी लावली. 

२०० मिलिमीटरहून अधिक पावसाची ठिकाणे 
जव्हार ४३४, वाडा ४१८, माथेरान ३३१.४, कर्जत ३२१.८, पेठ ३१५, लोणावळा कृषी ३१३.१, मोखेडा २८९.४, विक्रमगड २३१, वाडा २१८, खालापूर २०२, महाड २०७, पोलादपूर २७१, सुधागडपाली २२०, लांजा २२०, संगमेश्‍वर २५२, मुरबाड २२६, शहापूर २०५, गगनबावडा २६५, हर्सूल २३२.६, इगतपुरी २४०, ओझरखेडा २४९.२, त्र्यंबकेश्‍वर २१६. 

पावसाचा दणका 
कोकणात सर्वंच भागांत अतिवृष्टी 
हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली 
ढगफुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावे जलमय 
मराठवाडा पावसाच्या रडारवर 
कोल्हापूरमध्ये एका दिवसात नद्या पात्राबाहेर 
कोयना धरणात पाण्याची मोठी वाढ 
‘निम्न दुधना’तून १२ हजार ४९२ क्युसेकने विसर्ग सुरू 
विष्णुपुरीचे पाच दरवाजे उघडले 

राज्यात गुरुवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटर : स्रोत ः हवामान विभाग 
कोकण : कुलाबा ९६.६, महालक्ष्मी ६०, सांताक्रूझ ५७.७, पालघर ७७.४, माणगाव १६८, म्हसळा ८७, पनवेल १३७.६, पेण १४६, रोहा १२९, श्रीवर्धन ५८, तळा १७७, उरण ९८, दापोली १६०, हर्णे ६०.८, खेड १९५, मंडणगड १६५, राजापूर १३९, रत्नागिरी ९५.७, देवगड ६३, दोडामार्ग ७५, कणकवली ७७, कुडाळ ५०, रामेश्‍वर ७९.८,सावंतवाडी ५०, वैभववाडी १३१, आंबरनाथ ११२, भिवंडी १४२, कल्याण १८९, ठाणे १३२, उल्हासनगर १२२, 

मध्य महाराष्ट्र : आजरा ८२, गडहिंग्लज ५२, गारगोटी ७५, हातकणंगले ५५, कागल ९३, करवीर १०३.५, पन्हाळा १४८, राधानगरी १८८, शाहूवाडी ७८, घोडेगाव १२९, भोर ५५, चिंचवड ३५.५, पौड ११२, वडगाव मावळ १०६, वेल्हे १३६, जावळीमेढा १४६, कराड ८५, पाटण १६३.३, सातारा ९२.७, वाई १४०, 

मराठवाडा : माजलगाव ५४, आंबड ५८, घनसांगवी ७५, मंठा ८०, परतूर ६९, अहमदपूर ६३, चाकूर ५०, भोकर ६७, बिलोली ५९, देगलूर ५३.२, धर्माबाद ६०, हादगाव ५५, 
हिमायतनगर ६२, किनवट ९८, लोहा ५५, माहूर ६८, गंगाखेड ६०, जिंतूर ९४, मानवत १२५, पालम ९४, परभणी १०५, पाथरी १३३, पूर्णा ६६, सेलू १०५, 

विदर्भ : अकोला ११६.४, बाळापूर ८५.५, बार्शीटाकळी १६८.६, पातूर ६९.७, लाखंदूर ६३, पवनी ८०, लोणार ७७.४, मेहकर ५०.३, सिंदखेड राजा ५५.३, चिमूर ५६.७, आंबाझरी ८५.१, कामठी ५४.१, कुही ६०, सावनेर ५६, उमरेड ६२.१, आष्टी ७८, समुद्रपूर ५२.५, करंजालाड ५९.२, मालेगाव ५७.२, मंगरूळपीर ११४.६, मानोरा ६५.८, दारव्हा ५६.८, दिग्रस ७४.३, महागाव ८४.१, पुसद ७५.३, उमरखेड ८६.९.


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...