agriculture news in marathi, heavy rain in state, pune, maharashtra | Agrowon

राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळ
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, यामुळे दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडेल. विदर्भातही काही प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, पुणे विभागाचे प्रमुख, हवामान विभाग, पुणे

पुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर; मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी; विदर्भातील अकोला, नागपूर जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सावंतवाडीत सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काढणी केलेल्या सोयाबीन, कापूस, भात आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

परतीचा पाऊस मार्गी लागल्यानंतर उन्हाचा पारा वाढला होता. शुक्रवारी (ता. १८) सायंकाळनंतर आणि शनिवारी (ता. १९) सकाळपासून पावसाने सुरवात केली. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागांत दिवसभर संततधार सुरू होती, त्यामुळे कमाल तापमानात घट झाली असून, रात्री हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता.

दोन दिवसांपासून कोकणातील अनेक भागांत शुक्रवारपासून पावसाचे वातावरण तयार झाले. सिंधुदुर्गमधील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांतही मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या. सावंतवाडीनंतर देवगड येथे ९५, वैभववाडी ६०, लांजा ६०, दोडामार्ग ४५, कणकवली ४४, राजापूर ५२ मिलिमीटर पाऊस पडला. अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. शनिवारीही (ता. १९) दिवसभर अनेक भागांत हवामान ढगाळ असून पावसाच्या काही ठिकाणी तुरळक सरी बरसत होत्या.

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथे सर्वाधिक ५६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. नगर, नाशिक, सोलापूरमध्ये पावसाने तुरळक ठिकाणी चांगली हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागांत पाऊस पडला. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्या परिसरातही हवामान काही प्रमाणात ढगाळ होते.

मराठवाड्यातही बहुतांशी भागांत ढगाळ हवामानामुळे मुसळधार पाऊस पडला. नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील जवळपास वीसहून अधिक मंडळांत मुसळधार पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ९६, खानापूर ८१, शहापूर ७२, मरखेल ८९ मिलिमीटर पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर परिसरातील अनेक भागांत शेतातील काढणीस आलेल्या कापसाचे नुकसान झाले. नांदेडमधील देगलूर परिसर आणि उस्मानाबादमधील वाशी परिसरात झालेल्या अतिपावसामुळे काढणी केलेल्या सोयाबीन पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस स्वरूपाचा पाऊस पडला. इतर भागातही पावसाच्या सरी बरसत होत्या. नागपूरमध्येही पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या. तर अमरावती, वाशीम, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांच्या परिसरात हवामान अंशतः ढगाळ असून अधूनमधून ऊन पडत होते.  
 
पाऊस दृष्टिक्षेपात

  • सावंतवाडी येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद
  • डोकेवाडी (ता. भूम) येथील आंबेमोहोळ नदी दुथडी भरून वाहिल्याने लेंढी नदीला पूर
  • देगलूर, वाशी परिसरात अतिपावसामुळे सोयाबीन पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान  
  • खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथील तुकाराम चौगुले, सोमा चौगुले यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू  

आज, उद्या पावसाचा अंदाज कायम
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर झाले आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तसेच, बंगालचा उपसागर आणि श्रीलंका या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस राहणार आहे, त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून आज आणि उद्या राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...