agriculture news in Marathi, heavy rain in three Talukas in Akola District, Maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

अकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

शुक्रवारी (ता. २०) या भागातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांमध्ये पावसाने दाणादाण उडविली. तेल्हारा तालुक्यात ७१.३, बार्शीटाकळी ८२.२, पातूर ७३.४ असा जोरदार पाऊस नोंदविल्या गेला. याशिवाय अकोला ३९.२, अकोट ३८.८, बाळापूर ५५.१, मूर्तिजापूर १३ मिलिमीटर पाऊस झाला. पातूर, तेल्हारा, बार्शीटाकळी तालुक्यातील नदी-नाले जोराने वाहत आहेत.

प्रामुख्याने तेल्हारा तालुक्यातील सततच्या व अतिपावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. पावसाच्या पाण्यासोबतच वान प्रकल्पाचे ४ दरवाजे ५० सेंटिमिटरने उघडण्यात आल्याने वान नदीला पूर आला आहे. यामुळे नदी काठावरील बहुतांश गावांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. पातुर तालुक्यातील तांदळी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांचे पुराच्या पावसाने केले नुकसान झाले. शुक्रवारी रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदीला पूर येऊन पाणी शेतात शिरले. उभी पिके जमिनदोस्त झाली आहेत.

वाशीम जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत पहिल्यांदा सार्वत्रिक व जोरदार पाऊस आला. वाशीममध्ये या पावसाची ३५.८३, मालेगाव २५.७०, रिसोड १.१३, मंगरुळपीर ४२.१४, मानोरा १७.७७, कारंजा ३१.२८ मिलिमीटर नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर (५१.३ मिली) तालुका वगळता इतरत्र मध्यम स्वरूपातील पाऊस झाला. जळगाव जामोद ५.४, चिखली ९.७ बुलडाणा ३.८, देऊळगावराजा ६.२, मेहकर २६, सिंदखेडराजा ११.८, लोणार ६.८, खामगाव २५, शेगाव ३१.७, मलकापूर १६.४, मोताळा १७.४ मिलिमीटर पाऊस पाडला. 

प्रकल्पांतील साठा वेगाने वाढतोय
सप्टेंबर महिन्यात होत असलेला पाऊस रब्बी हंगाम तसेच प्रकल्पांसाठी फायदेशीर बनला आहे. या विभागातील प्रकल्पांमध्ये जोमाने साठा वाढत आहे. काटेपूर्णा प्रकल्पात २६.६२ दलघमी (३०.८३ टक्के), वान ८१.९५ दलघमी(१०० टक्के), नळगंगा ३०.९० दलघमी(४४.५८ टक्के), पेनटाकळी ५९.९७ दलघम (५४टक्के), खडकपूणा ४ ३८.६२ दलघमी(४१.३४ टक्के) साठा झाला आहे. वान प्रकल्पाचे ४ गेट ५० सेमीने उघडले असून १८३.१४ घनमीटर प्रतिसेंकद विसर्ग होत आहे. पेनटाकळीचे ९ गेट ३० सेंमीने उघडण्यात आले. यातून २८५.४८ घमी प्रतिसेंकद विसर्ग सुरू आहे. मध्यम प्रकल्पांपैकी मोर्णा, उमा, घुंगशी बॅरेज, अडाण, सोनल, एकबुर्जी, ज्ञानगंगा, पलढग, मस, मन, तोरणा, उतावळी हे सर्वच प्रकल्प वधारले आहेत. ज्ञानगंगा, पलढग, मस, तोरणा हे चार मध्यम प्रकल्प आधीच १०० टक्के भरलेले आहेत. 


इतर बातम्या
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...