agriculture news in marathi, heavy rain in varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात सर्वदूर दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 जुलै 2018

अकोला : या हंगामात अातापर्यंत काहीसा रुसलेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत बऱ्यापैकी बरसला अाहे. सोमवारी सकाळपर्यंत वऱ्हाडात सर्वदूर पाऊस झाला असून, यामुळे पिकांना तसेच रखडलेल्या पेरण्यांना फायदा होणार अाहे. अकोला जिल्ह्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळेमन नदीला गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा पूर सोमवारी (ता.नऊ) सकाळी आला. यामुळे शेगाव-अकोला (नागझरीमार्गे) मार्गाची वाहतूक बराच काळ ठप्प होती. 

अकोला : या हंगामात अातापर्यंत काहीसा रुसलेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत बऱ्यापैकी बरसला अाहे. सोमवारी सकाळपर्यंत वऱ्हाडात सर्वदूर पाऊस झाला असून, यामुळे पिकांना तसेच रखडलेल्या पेरण्यांना फायदा होणार अाहे. अकोला जिल्ह्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळेमन नदीला गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा पूर सोमवारी (ता.नऊ) सकाळी आला. यामुळे शेगाव-अकोला (नागझरीमार्गे) मार्गाची वाहतूक बराच काळ ठप्प होती. 

बुलडाणा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी नदी-नाले वाहते झाले अाहेत. या जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या मन नदीला मोठा पूर आल्याने शेगाव-नागझरीमार्गे अकोला वाहतूक बंद पडली होती. खामगाव तालुक्यातील विहिगाव अटाळी येथून उगम पावणाऱ्या या नदीला मागील सहा वर्षांत यंदा प्रथमच मोठा पूर अाल्याचे सांगितले जात होते.

शेगाव तालुक्यात आजवर दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट होते. मात्र रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे हे संकट तुर्त टळले आहे. याच जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यांमध्ये अाजवर पावसाचा जोर कमी होता, परंतु या पावसामुळे अाता बऱ्यापैकी दिलासा मिळाला अाहे. घाटाखालील जळगाव जामोद हा तालुका सोडला तर उर्वरित सहा तालुक्यांमध्ये सर्वत्र चांगला पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी बरसत होत्या.

अकोला जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत घेतलेल्या नोंदीमध्ये पातूर तालुक्यात सरासरी ८१.८ मिमी पाऊस झाला. या तालुक्यात बाभूळगाव मंडळात सर्वाधिक १६६ मिमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पाणी आले. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. बाळापूर तालुक्यातही जोरदार पावसाने दाणादाण उडवली. आलेगाव आणि चान्नी मंडळातही सरासरी ८० मिमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील निर्गुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पूर्णा खोऱ्यात असलेल्या सर्व उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. वाशीम जिल्ह्यातसुद्धा रविवारी रात्री सर्वत्र पाऊस झाला. प्रामुख्याने रिसोड, मालेगाव तालुक्यात चांगला पाऊस पडला अाहे.    

 जिल्हानिहाय पाऊस (मिमी) : अकोला जिल्हा ः अकोला ६.२, बार्शिटाकळी १९.७, अकोट ८, तेल्हारा १५, बाळापूर ४६, पातूर ८१.८, मूर्तिजापूर ६.८,  सरासरी २६.२ मिमी.
बुलडाणा जिल्हा ः  बुलडाणा २५.६, चिखली ११, देऊळगावराजा ११.२, सिंदखेडराजा १३.८, लोणार २४.२, मेहकर ३३.४, खामगाव २०.९, शेगाव २२.६, मलकापूर ३३.४, नांदुरा १०.२, मोताळा ४८.३, संग्रामपूर  १३.२, सरासरी २०.६ मिमी.
वाशीम जिल्हा ः वाशीम-११.८२, मालेगाव २५.३०, रिसोड ३९.६२, मंगरूळपीर ९.२९, मानोरा १५.७८, कारंजा १२.१५, सरासरी १९ मिमी.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...