agriculture news in Marathi, heavy rain in Vidarbha and Marathwada, Maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात जोर; कोकण, मध्य महाराष्ट्र हलक्या सरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जुलै 2019

पुणे : कोकण, घाटमाथ्यावर गेले काही दिवस दमदार बरसणाऱ्या पावसाने विदर्भ, मराठवाड्यात जोर धरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मंगळवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने काहीशी उसंत घेतील असून, पावसाच्या हलका सरी पडत आहेत. 

पुणे : कोकण, घाटमाथ्यावर गेले काही दिवस दमदार बरसणाऱ्या पावसाने विदर्भ, मराठवाड्यात जोर धरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मंगळवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने काहीशी उसंत घेतील असून, पावसाच्या हलका सरी पडत आहेत. 

बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाब क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर विदर्भ, मराठवाड्यात पावसाने जोर धरला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, तर विदर्भातील बुलडाणा, नागपूर, भंडारा आणि गोंदियात पावसाने जोरदार हजेरी लावली. विदर्भातील ११ हून अधिक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. बुधवारी (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती. 

कोकण : रायगड : चौल ४१, रोहा ५०, नागोठणे ५१, चानेरा ५७, कोलाड ५१, पोलादपूर ४५, कोंडवी ७६, वाकण ५४, बवरली ४५.रत्नागिरी : चिपळूण ४८, खेर्डी ४१, रामपूर ४२, वहाळ ५४, असुर्डे ४२, दापोली ४३, शिर्शी ५२, भरणे ४३, दाभीळ ५०, धामणंद ४०, गुहागर ४९, तळवली ६०, पाटपन्हाळे ५०, आबलोली ६२, हेदवी ४२, कडवी ४०, मुरडव ४२, माखजन ६५, फणसवणे ५०, राजापुर ४३, कोंडये ४८, लांजा ४६. सिंधुदुर्ग : शिरगाव ४९, वेतोरे ४१, कणकवली ४५, सांगवे ४९, नांदगाव ४८, कुडाळ ४१, कसाल ५०, येडगाव ४६.पालघर ः डहाणू ५८, मालयण ५५, चिंचणी ६८, सफला ४५, तलसरी ५०, झरी ५०.
मध्य महाराष्ट्र : नाशिक : वडनेर ३७, कौलाने ४२, तहाराबाद ४०. धुळे : सोनगीर ३४, बोराडी ३५, होळनांथे ३०, चिमठाणा ३८. जळगाव : खिर्डी ३२, अंतुर्ली ३१, कुऱ्हा ३९, पातोंडा ४५, अमळगाव ३९, चोपडा ४९, चहार्डी ४६, लासूर ७०, कासोदा ६२, फत्तेपूर ३२, तोंडापूर ३६, पाचोरा ५५, साळवा ६०, सोनवद ३५. पुणे : कार्ला ३०, लोणावळा ३७. सातारा : हेळवाक ५८, मोरगिरी ३३, महाबळेश्‍वर ६४,कोल्हापूर : गगनबावडा ४०, मडिलगे ३२, तुर्केवाडी ५४. 
मराठवाडा : औरंगाबाद : कन्नड ४८, चापनेर ५४, चिखलठाणा १२९, चिंचोली ३३, निल्लोड ६९, गोळेगाव ५५, अजिंठा ५६. जालना : भोकरदन ८८, सिपोरा ५४, धावडा ४८, आनवा ७९, राजूर ५९, केदारखेडा ६५, जाफराबाद ७१, माहोरा ९०, कुंभारझरी ४४, टेंभुर्णी ६५, वरूड ८०, जालना शहर ९५, शेवळी ४८, पांचवडगाव ५०, बावने ४४, रोशणगाव ४४. बीड : सिरसाळा ४०, पिंपळगाव ३०. लातूर : अहमदपूर ३५, आंधोरी ४३, हडोळती ४८, जळकोट ६३.नांदेड : बिलोली ३५, जांब ६०, येवती ३३, जाहूर ४६, कंधार ३४, कुरूळा ३९, फुलवळ ३८, खानापूर ४५, शहापूर ३२, मांडवी ४७, दहेली ३१, माहूर ३४. परभणी : दैठणा ३१, महातपूरी ३२, माखणी ३७, बनवस ४५, आवलगाव ३२. हिंगोली : हिंगाली ३८, सिरसम बु. ४७, बासंबा ३२, डिग्रस ३२, खंबाळा ३९, वारंगा फाटा ३०, पानकनेरगाव ३३.
विदर्भ : बुलडाणा : पातुर्डा ८३, कवठळ ६१, मेरा ५५, शेलगाव ६२, देऊळगावराजा शहर ५१, अंढेरा ५४, हिवरा ८०, डोणगाव १०३, देऊळगाव ७५, लोणी ९०, अंजनी १०७, नायगाव ६६, खामगाव ६०, अटाळी ५३, पारखेड ५०. अकोला : पारस ३२, निंबा ८०. वाशीम : पार्डी टाकमोर ५८, अनसिंग ६६, वारळा ५३, कोंढाळा ५४, पार्डी आसरे ७६, गोवर्धन ६२. अमरावती : धारणी ४८, हरीसळ ४१, चिखलदरा ५९, नांदगाव ४९, बेलोरा ४३. यवतमाळ : पुसद ६५, खंडाळा ५५, बोराळा ४३, ब्राह्मणगाव ५३, जांब ६७, वरूड ५५, गुंज ४१, कळी ४७, हिवरा ६०. नागपूर : वडोदा ४२, दिघोरी ४६, देवळापूर ५६, मुसेवाडी ५४, मौदा ४१, खाट ८८, धानळा ५६, कोडामेंडी ५१, मळेवाडा ५९, भिवापूर ५१, कारेगाव ५५, कुही ५७, मंधाळ ४९, पाचखेडी ४५, वेलतूर ४०, राजोली ४१, तितूर ५५.भंडारा : शहापूर ६९, बेला ६३, मोहाडी ६७, केरडी ७६, केंद्री ६९, नाकडोंगरी १५०, तुमसर ९०, शिवरा ११७, मिटेवणी १०३, गाऱ्हा ८०, कोंढा ६७, असगाव ६४, साकेली ७३, आकोडी ९२, मासाळ ६४, पोहारा ६१, पिंपळगाव ६९,गोंदिया : रावणवाडी ६६, गोंदिया ८५, खामरी ११४, कामठा ६४, काट्टीपूर १२०, परसवाडा ६०, तिरोडा ८८, मुंडीकोटा १३६, वाडेगाव ९०, ठाणेगाव ९२, मोहाडी ६१, नवेगावबांध १०९, बोधगाव देवी ८०, अर्जुनी ८३, महागाव ८०, केशोरी १११, दारव्हा ७७, सडक अर्जुनी ७५.चंद्रपूर : बह्मपूरी ४५, अन्हेर ४८, चौगण ५३. गडचिरोली : कुरखेडा १२०, पुराडा ७३, काढोली ५८, मुरूमगाव ७२, कोर्ची ८७, बेडगाव ६०, कोटगुळ ७२, देसाईगंज ५६.

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे 
डोणगाव १०३, अंजनी १०७ (बुलडाणा), नाकडोंगरी १५०, शिवरा ११७, मिटेवणी १०३ (भंडारा), खामरी ११४, काट्टीपूर १२०, मुंडीकोटा १३६, नवेगावबांध १०९, केशोरी १११ (गोंदिया), कुरखेडा १२० (गडचिरोली).

पावसाचा जोर ओसरणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबक्षेत्र पूरक ठरल्याने विदर्भ, मराठवाड्यात पाऊस झाला. आजपासून (ता. ४) राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

गुजरातमध्ये मॉन्सूनची वाटचाल
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ३) वाटचाल सुरूच ठेवत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या काही भागांत प्रगती केली आहे. शुक्रवारपर्यंत देशाच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान आहे.


इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...