विदर्भात जोरदार पावसाची हजेरी (video सह)

नागपुरात दमदार पाऊस
नागपुरात दमदार पाऊस

नागपूर  ः विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.६) जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात गुरुवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (ता.५) रात्रीपासूनच पाऊस बरसत होता. शुक्रवारी (ता.६) पहाटेपर्यंत धो-धो पाऊस कोसळत होता. अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा जास्त असल्याने शहरी वस्त्यांमध्ये पाणी तुंबत ते नागरिकांच्या घरांत शिरले. यवतमाळ जिल्ह्यातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. सरासरी १७ मिमी पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंत झाली. वर्धा जिल्ह्यातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. हिंगणघाट तालुक्‍यात पाऊस जास्त झाल्याने या भागात जनजीवन विस्कळित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अमरावती जिल्ह्यात तुरळक पाऊस बरसला. अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पावसाने उपनगराचे झाले तळे... पहा Video

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com