विदर्भात पावसाच्या जोरदार सरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा, तर मराठवाड्यात हलक्या सरी पडल्या. आज (ता. २४) विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच निवळू लागले आहे. सोमवारी दुपारनंतर पश्‍चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात दाट ढग जमा झाले होते. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलके ढग होते. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसह अधूनमधून ऊनही पडत होते. राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, उद्यापासून (ता. २५) कोकण वगळता राज्याच्या उर्वरित हलक्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. २९) बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले  आहेत. 

सोमवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग) :  कोकण : शहापूर १३५, डोलखांब ४१, धामनंद ४२, मंडणगड ५५, म्हाप्रल ५९, देव्हरे ५१, कोंडगाव ५४, राजापूर ५३, सवंडल ५३, सावंतवाडी ४६, बांदा ५६, अंबोली ११०, कणकवली ४२, कुडाळ ५३, कसाल ४८, वलवल ५७, मानगाव ५६, पिंगुली ५५, भेडशी ५३, कांचड ४१, जव्हार ४२. 

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ८३, धारगाव ३४, नेर ८६, शेंडी ५९, घोटावडे ३२, माले ४५, मुठे ३६, भोलावडे ९५, काले ६२, कार्ला ६४, खडकाळा ३२, लोणावळा ५०, पानशेत ३३,  राजूर ४७, अपटाळे ३५, हेळवाक ४६, महाबळेश्‍वर ६६, पाचगणी ७३, तापोळा ९८, बाजार ३२, करंजफेन ४१, आंबा ६७, राधानगरी ५१, साळवण ३८, कडेगाव ३५, कराडवाडी ४५, गवसे ३२, चंदगड ४०, हेरे ३२.

विदर्भ : अमडापूर ३०, जानेफळ ४०, शेलगाव ३०, वरवंड ३०, लोणी ३०, अंजनी ३८, मुंगळा ५०, शेलू बाजार ३७, धारणी ३२, चुर्णी ३४, लोणी ३५, तळेगाव ४२, पुलगाव ४२, विजय गोपाल ३१, गिरोली ३०, हिंगणघाट ३५, नागपूर ४५, सिताबार्डी ३८, पार्डी ३४, बोरी ४०, वाडी ५४, हिंगणा ३८, वानाडोंगरी ३८, देवळापूर ४९, मुसेवाडी ५२, खाट ३९, धानळा ३२, काटोल ३१, कोंढळी ३५, मेंधळा ४७, पहेली ३९, मोहाडी ३०, केरडी ३८, केंद्री ३०, नाकडोंगरी ५०, मिटेवणी ५१, गाऱ्हा ३०, अड्याळ ४०, चिंचळ ३०, असगाव ३९, साकेली ४२, आकोडी ४३, सांगडी ६५, विरळी ५१, लाखंदूर ४२, बारव्हा ३२, मासाळ ४५, लाखनी ३६, पालंदूर ३२, गंगाझारी ३६, दासगाव ३५, कामठा ५३, काट्टीपूर ३५, आमगाव ३५, तिगाव ५८, ठाणा ४८, परसवाडा ४७, तिरोडा ५६, मुंडीकोटा, ३० वाडेगाव ५९, ठाणेगाव ४८, गोरेगाव ५५, कुऱ्हाडी ५३, मोहाडी ६३, कवरबांध ३५, सालकेसा ४२, शिखारीटोळा ३८, देवरी ५६, चिंचगड ३५, नवेगावबांध ३५, बोधगाव देवी ३१, महागाव ४६, केशोरी ६५, सौदाद ५९, दारव्हा ४०, सडक अर्जुनी ६५, चांदनखेडा ३२, कुरखेडा ४५, पुराडा ४७, काढोली ३०, पेंटीपका ३०, असारळी ४९, कोर्ची ४९, बेडगाव ५१, कोटगुळ ४२. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com