मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज

मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज
मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज

पुणे : राज्याचा दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन - तीन दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. बुधवारी रात्री पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने भात, ऊस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  बुधवारी सकाळपासून असलेल्या कडक ऊन आणि उकाड्यानंतर सायंकाळी ढग दाटून आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, सांगलीत अनेक ठिकाणी सुमारे दीड तास दमदार पाऊस पडत हाेता. कोल्हापुरातील मुरगुड येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे ऊस, भात पिके आडवी होऊन साचलेल्या पाण्यात भिजल्याने फटका बसणार आहे. तर काढणीस आलेल्या साेयाबीन पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.   मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यास पोषक स्थिती तयार होत असून, गुरुवारी राजस्थामध्ये वाऱ्यांची दिशा बदलल्याचे दिसून आले. शनिवारपर्यंत माॅन्सून परतीच्या प्रवासाला सुरवात होण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकपासून मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय अाहे. तर दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत अाहेत. यामुळे राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान होत असून वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळल्याने उंच लाटा उसळ्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे : जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी जाेरदार पाऊस. गाेळेगाव येथे पडत असलेल्या सरींचा video

गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग) :    कोकण : गुहाघर ७५, पाटपन्हाले ७४, अबलोली ८०, रत्नागिरी ७०, पावस ३४, फणसोप ४८, कोटवडे ३५, तरवल ३४, पाली ३२, कडवी ४६, फुणगुस ३४, अंगवली ३७, माभले ३२, तेरहे ५३, राजापुर ४०, लांजा ३४, भांबेड ४५, पुनस ३०, साडवली ३८, विलवडे ३५, श्रावण ३२, मदुरा ३५, भुइबावडा ३५, तालवट ३१.   मध्य महाराष्ट्र : दौंड २४, जेजूरी २१, चळे २०, जवळा ४३, अपशिंगे २२, आनेवाडी २४, कुडाळ २२, पाटण २४, कराड ४७, कोपर्डे-हवेली ४३, सैदापूर ४१, शेणोली ३७, काले ३४, मलकापूर ४५, कोरेगाव २८, शिरंबे २९, वाठार-किरोली ४२, औंध ४६, पुसेसावळी ३४, मायणी ४०, कातरखटाव ३३, दहिवडी २६, गोंदावले ३५, कुक्‍कुडवाड ३७, मार्डी ५१, शिंगणापूर २८, तरडगाव २२, बुधगाव २५, मिरज ३५, सांगली २८, संख ५५, माडग्याळ ५०, जत २९, मुचुंडी ३८, डफळापूर २२, कुंभारी २०, शेगाव ४३, करंजे ६०, लेंगरे २४, विटा ५१, कोरेगाव ३५, कुरळप २९, तांदूळवाडी ४७, आष्टा ४०, इस्लामपूर २६, मणेराजूरी २४, तासगाव २८, कोकरुड २३, शिराळा ३०, शिरसी ३३, मांगले ४९, सागाव ५८, देशिंग ४९, कवठेमहांकाळ ३९, हिंगणगाव ५२, भिलवडी ४४, कुंडल २७, अंकलखोप ३८, पलूस ३२, वांगी ३५, नेवरी २७, कडेगाव २५, शाळगाव ३४, हातकणंगले २४, हेर्ले ३९, शिरोळ ४०, नांदणी २६, जयसिंगपूर २५, शिरढोण २१, दत्तवाड २२, वाडी-रत्नागिरी ३४, कोडोली ३४, बाजार २३, राधानगरी ४५, सरवडे ३६, आवळी ४१, राशिवडे २८, कसबा ५५, करवीर ७२, निगवे ७२, मुडशिंगी ६८, शिरोली-दुमाला ४०, इस्पूर्ली २२, कणेरी ३६, कागल ५२, सिद्धनेर्ली ५१, केनवडे ३६, मुरगुड ११०, बिद्री ४३, गडहिंग्लज २४, दौंडगे २६, नेसरी २७, गारगोटी ३५, कूर ४१, कोवाड ३२, हेरे ३८.   मराठवाडा : बोरोळ २२, लोहारा २३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com