agriculture news in marathi, heavy rain in west part of district, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची दमदार हजेरी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जुलै 2019

पुणे   : जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड तालुक्यांतील १८ मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा येथे सर्वाधिक २५८ तर कार्ला येथे २०५ मिलिमीटर, जुन्नर तालुक्यातील राजूर येथे २५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

पुणे   : जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड तालुक्यांतील १८ मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा येथे सर्वाधिक २५८ तर कार्ला येथे २०५ मिलिमीटर, जुन्नर तालुक्यातील राजूर येथे २५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

दोन दिवसांपासून पश्चिम भागात पावसाने जोर धरला आहे. पूर्व भागातील शिरूर, हवेली, दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यात मात्र हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. घाटमाथा आणि पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसाने नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खरिपाच्या पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. मावळ पट्ट्यात भात खाचरे तुडुंब भरल्याने लागवड झालेल्या भात पिकाची जोमदार वाढ होणार असून, शिल्लक क्षेत्रावरील भात लागवडीला वेग येणार आहे.  

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : खडकवासला ४०, चिंचवड ४८, पौड १२०, घोटावडे १२५, माले १४०, मुठा ११२, पिरंगूट १२१, भोर ४७, भोलावडे १६५, नसरापूर ४१,आंबवडे ५६, संगमनेर ६०, निगुडघर ९५, वडगाव मावळ ११६, तळेगाव ९६, काळे १६०, कार्ला २०५, खडकाळा १६९, लोणावळा २५८, शिवणे ९८, वेल्हा १९३, पानशेत १५०, विंझर ९७, आंबवणे ४२, जुन्नर ७०, राजूर २५३, डिंगोरे १२२, आपटाळे १०५, ओतूर ५४, वाडा ११०, राजगुरूनगर ४६, कुडे १३०, पाईट ८०, चाकण ४०, कण्हेरसर ५४, कडूस ६८, घोडेगाव ४९, आंबेगाव (डिंभे) ९९.
 
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी
जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. पाणलोटातून वाहणारे नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : टेमघर ११२, वरसगाव १४८, पानशेत १५०, खडकवासला ४०, पवना १६०, कासारसाई ५६, मुळशी १४०, कळमोडी ११४, चासकमान ६१, भामा आसखेड ७४, आंद्रा ९५, वडीवळे १८०, गुंजवणी ११८, भाटघर ६८, नीरा देवघर ९५, वीर ५, नाझरे १९, पिंपळगाव जोगा ४७, माणिकडोह ६७, येडगाव ४६, वडज ६२, डिंभे ९९.


इतर ताज्या घडामोडी
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...
यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...
आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...
नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...
चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...
पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...
पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...