पुण्याच्या पश्चिमेकडे दमदार पाऊस

पुण्याच्या पश्चिमेकडे दमदार पाऊस
पुण्याच्या पश्चिमेकडे दमदार पाऊस

पुणे : जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये शनिवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दमदार पाऊस झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने तळाशी गेलेल्या धरणांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. मावळ तालुक्यात पावसाचा अधिक जोर होता. कार्ला येथे सर्वाधिक २४२, तर लोणावळा येथे २४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पूर्व भागातील तालुक्यांमध्ये हलक्या सरी बरसल्या.  

मॉन्सून दाखल झाल्यानंतर ओसरलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर आणि जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या तालुक्यांच्या पूर्व भागासह, शिरूर, हवेली, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यांत मात्र पावसाचा जोर कमी होता. मात्र ढगाळ हवामानासह दिवसभर सरीवर सरी येत होत्या. 

या पावसामुळे पूर्वमशागत झालेल्या भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. भातपट्ट्यात रोप वाटिका वाढीच्या अवस्थेत असून, पावसामुळे फायदा होणार आहे. 

जिल्ह्यातील पाऊस (स्त्रोत - कृषी विभाग)

कोथरूड ८७, खडकवासला ५०, खेड ५७, भोसरी ५८, चिंचवड ९७, कळस ४५, पौड ९८, घोटावडे ७९, थेरगाव ६८, माले १५०, मुठे १६८, पिरंगूट ८९, भोलावडे ७१, नसरापूर ४३, वेळू ५२, वडगाव मावळ १३१, तळेगाव १३६, काले १५२, कार्ला २४२, खडकाळा १८५, लोणावळा २४०, शिवणे १३६, पानशेत ९४, विंझर १०३, अंभवणे ६६, राजूर ४३, डिंगोरे ५२, आपटाळे ५२, राजगुरूनगर ६७, कुडे ६३, पाईट ११०, चाकण ९१, आळंदी ५०, कन्हेरसर ५२, कडूस ८३, घोडेगाव ५२, आंबेगाव १२३, कोरेगाव ४७.

वडीवळे धरणक्षेत्रात ३५० मि.मी.

धरणांच्या पाणलोटात पडत असलेल्या दमदार पावसामुळे झरे, ओढे, नाले, नद्या वाहू लागल्या आहेत. त्यामुळे धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. वडीवळे धरण क्षेत्रात सर्वाधिक ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : वरसगाव १५१, पानशेत १७०, खडकवासला ७६, टेमघर १९७, पवना १५८, कासारसाई ९८, मुळशी १३१, कलमोडी ८१, चासकमान ६५, भामा आसखेड ११३, आंद्रा १३६, वडीवळे ३५०, गुंजवणी १३२, भाटघर २७, नीरा देवघर ७४, वीर ११, नाझरे १६, माणिकडोह ४२, येडगाव २७, पिंपळगाव जोगा २२, वडज २९, डिंभे ५४.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com