पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर

पाऊस
पाऊस

पुणे : जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाने चांगलाचा जोर धरला आहे. धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या या भागातून नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर, पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यांत हलक्या सरी पडल्या   पुणे जिल्ह्याला लागून असलेल्या रायगड, ठाणे जिल्ह्यासह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. सह्याद्रीच्या पूर्व उतारवर असलेल्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडत असून, पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत आहे. पावसामुळे खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. भातरोपे वाढीच्या अवस्थेत असून, चिखलणीची कामे सुरू आहेत. लवकरच भात लागवडीला वेग येणार आहे. पावसामुळे पेरणी झालेल्या भागात पिकांची उगवण होऊ लागली आहे.  सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (स्रोत - महसूल विभाग) : खेड शिवापूर ६०, पौड ५७, घोटावडे १०५, माले ११९, मुठा १०४, पिरंगुट ७३, भोलावडे ७२, नसरापूर ३३, आंबवडे ३३, निगुडघर ७७, वडगाव मावळ ३०, काळे ६६, कार्ला १२९, खडकाळा ८८, लोणावळा १०२, वेल्हा ६६, पानशेत ८५, विंझर ३३, आंबवणे ३९, राजूर ४५, ओतूर ४६, कुडे ४३, आंबेगाव (डिंभे) ४५. धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे भाटघर, नीरा-देवघर, पानशेत, वरसगाव, खडकवासला, मुळशी, पवना, चासकमानसह सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. सोमवारी (ता. ८) खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून सुमारे ८.०७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. खडकवासला धरण निम्मे भरले. सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंत मुळशी धरण क्षेत्रात ११९ मिलिमीटर, टेमघर १२४, वरसगाव ८४, पानेशत ८४, गुंजवणी १४०, नीरा देवघर ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) : टेमघर ०.३१, वरसगाव २.८८, पानशेत ३.६७, खडकवासला १.२१, पवना २.२३, कासारसाई ०.२२, मुळशी ३.७८, कळमोडी ०.९५, चासकमान १.३६, भामा आसखेड १.७०, आंद्रा १.४४, वडीवळे ०.६६, गुंजवणी १.०३, भाटघर ४.५२, नीरा देवघर २.३९, वीर २.१६, पिंपळगाव जोगा ०, माणिकडोह ०.८२, येडगाव ०.०३. वडज ०.१७, डिंभे १.७६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com