agriculture news in Marathi, heavy rain in with wind, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जोरदार वाऱ्यासह मुसळधार सरींची हजेरी
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पुणे ः मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत सकाळच्या उकाड्यानंतर दुपारी ढग दाटून येत, मेघगर्जनेसह वळवाच्या जोरदर सरी पडत आहे. शनिवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे सर्वाधिक ८५.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

पुणे ः मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत सकाळच्या उकाड्यानंतर दुपारी ढग दाटून येत, मेघगर्जनेसह वळवाच्या जोरदर सरी पडत आहे. शनिवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे सर्वाधिक ८५.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली. यामुळे ऑक्टोबर हिट वाढल्याने सकाळपासून उकाड्यात वाढ होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपासूनच उन्हाचा चटका अधिक होता. दुपारनंतर अचानक ढग जमा झाल्याने दुपारी तीन वाजेपासून जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते.
शनिवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.

तर सातारा, रत्नागिरी, ब्रम्हपुरी, चंद्रपूर येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. तर ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्रातील नगर येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.३ अंश सेल्सिअसने घट होऊन २७.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमान नोंदविले गेले. तर नाशिक, सोलापूर, महाबळेश्वर, उस्मानाबाद, औरंगाबाद, अमरावती, गोंदिया येथील कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली होती.

कोकणातील मोखेडा येथे सर्वाधिक ३८ मिलिमीटर पाऊस पडला. तर भिवंडी, सुधागडपाली अशा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील कर्जत येथे ६४ मिलिमीटर पावासाची नोंद झाली. जुन्नर तालुक्यातील निमगाव ५९ मिलिमीटर पाऊस पडला यामुळे ओढे, नाले पुन्हा खळाळून वाहू लागल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

पुणे शहर, संगमनेर, अकोले, हरसूल, करमाळा, कोरेगाव या भागातही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. तर मराठवाड्यातील लातूरमधील निलंगा येथे सर्वाधिक ८३ मिलिमीटर पाऊस पडला. हिंगोली, औसा, जळकोट, वैजापूर, केज येथेही मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. विदर्भातही कळंब येथे ३८, देगलूर ३७ तर पूर्णा येथे ३५ मिलिमीटर पाऊस पडला.

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
उत्तर भारतातून येत्या चार ते पाच दिवसांत परतीच्या पावसाची वाटचाल सुरू होणार आहे. पावसाला वातावरण तयार होत असल्याने राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.      

शनिवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)
कोकण ः सांताक्रुझ १२.६, जव्हार २०, मोखेडा ३८, वाडा १४, रायगड २७, माणगाव १३, सुधागड पाली ३५, वेंगुर्ला १४, सावंतवाडी ३.४, भिवंडी ३६, कल्याण ६.८,
मध्य महाराष्ट्र ः नगर २१, अकोले ३९, कर्जत ६४, संगमनेर ४६, श्रीगोंदा ८, रावेर ४, शाहूवाडी १५, शिरोळ २२, हरसूल ३०.२, नांदगाव २८.०, बारामती २९.८, भोर १९.०, आंबेगाव ८.०, जुन्नर १४, पुणे शहर ४३.८, पुरंदर २२.०, शिरूर १७, मिरज १५.२, सांगली १६.५, दहीवडीमाण २६.०, कऱ्हाड १०.०, खंडाळा बावडा १७, खटाव वडूज २८.४,  कोरेगाव ३२.०, महाबळेश्वर २२.७, सातारा ३१.५, करमाळा ३७.०, मोहोळ ८५.४,
मराठवाडा ः वैजापूर २८, अंबाजोगाई ११, केज ४२, पाटोदा २२, शिरूरकासार ४, हिंगोली ४०, अहमदपूर २४, औसा ३०, जळकोट २५, लातूर १४, निंलंगा ८३, रेणापूर १०,  शिरूरअनंतपाल ८, अर्धापूर ९, देगलूर ३७, उमरी १०, कळंब ३८, लोहारा ९, परांडा ७, उमरगा १४, जिंतूर ३, गंगाखेड, पालम २, पाथरी १२, पूर्णा ३५,
विदर्भ ः तेल्हारा २.३, अमरावती २.८, वरूड २.१, पौनी २.६, लोणार २.०, संग्रामपूर ६.५, इटापल्ली २.१,

इतर अॅग्रो विशेष
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...