Agriculture news in marathi Heavy rain with wind in Satara | Agrowon

साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून वादळीवाऱ्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजेचे पोल पडले. पिेकेही भूईसपाट झाली आहेत.

सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून वादळीवाऱ्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजेचे पोल पडले. पिेकेही भूईसपाट झाली आहेत. दुपारपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतातही पाणी साचले आहे. पावसामुळे सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. जिवीतहानी टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. 

निसर्ग वादळाचा तडाखा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी व वाई तालुक्याना बसू शकतो. यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी केले होते. बुधवारी पहाटेपासून वाऱ्यांचा वेग वाढून पावसास सुरूवात झाली होती. सकाळपासून पावसाचा जोर वाढला. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. 

पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव तालुक्यात पावासचा जोर अधिक होता. दुष्काळी माण, खटाव, फलटण या तालुक्यातही पाऊस झाला. शेतातील सर्व कामे ठप्प झाली. वाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे, शेळ्या-मेंढ्या गोट्यात बांधून ठेवल्या. काही घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. बाजारपेठाही ठप्प होत्या. खरिप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. मशागत झालेल्या शेतातील शेतकऱ्यांकडून पेरणीसही सुरवात होणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...
सापळा पिकांची लागवड महत्त्वाचीएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापनयवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....