नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित 

कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. शनिवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या माहितीनुसार ७६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
rain 24 june
rain 24 june

मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. शनिवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या माहितीनुसार ७६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरफ, नौदल आणि लष्कराच्या विविध कंपन्यांद्वारा बचाव कार्याला वेग घेतला आहे. 

बाधित जिल्हे : ९ यामध्ये कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश  एकूण बाधित गावे : ८९०  एकूण मृत्यू : ७६  बेपत्ता व्यक्ती : ५९  जखमी व्यक्ती : ३८  पूर्ण नुकसान झालेली घरे : १६  अंशतः नुकसान झालेली घरे : ६  पशुधन मृत्यू : ७५  सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती : ९० हजार  मदत छावण्या : ४  निवारा केंद्रे : रत्नागिरी ६ (२ हजार लोक)  सुविधांचे नुकसान : चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला  लष्कर आणि एनडीआरएफच्या २५ तुकड्या तैनात  मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ 

  • भुवनेश्‍वरहून मागविल्या ८ तुकड्या 
  • या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातील, तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील. 
  • तटरक्षक दलाच्या ३ , नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे 
  • एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या 
  • बोटी : ५९ (४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ) 
  • बचाव कार्य सुरु  अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला, तर सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाल्याने एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटनास्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचावकार्य सुरू केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरू करण्यात आली.  २ कोटी रुपये निधी  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, पाऊस आणि पाणी ओसरल्याने मदतकार्यास वेग आला आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com