agriculture news in Marathi heavy rainfall in nine district in state Maharashtra | Page 3 ||| Agrowon

नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. शनिवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या माहितीनुसार ७६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. शनिवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या माहितीनुसार ७६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरफ, नौदल आणि लष्कराच्या विविध कंपन्यांद्वारा बचाव कार्याला वेग घेतला आहे. 

बाधित जिल्हे : ९ यामध्ये कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश 
एकूण बाधित गावे : ८९० 
एकूण मृत्यू : ७६ 
बेपत्ता व्यक्ती : ५९ 
जखमी व्यक्ती : ३८ 
पूर्ण नुकसान झालेली घरे : १६ 
अंशतः नुकसान झालेली घरे : ६ 
पशुधन मृत्यू : ७५ 
सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती : ९० हजार 
मदत छावण्या : ४ 
निवारा केंद्रे : रत्नागिरी ६ (२ हजार लोक) 
सुविधांचे नुकसान : चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला 

लष्कर आणि एनडीआरएफच्या २५ तुकड्या तैनात 
मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ 

  • भुवनेश्‍वरहून मागविल्या ८ तुकड्या 
  • या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातील, तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील. 
  • तटरक्षक दलाच्या ३ , नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे 
  • एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या 
  • बोटी : ५९ (४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ) 

बचाव कार्य सुरु 
अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला, तर सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाल्याने एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटनास्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचावकार्य सुरू केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरू करण्यात आली. 

२ कोटी रुपये निधी 
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, पाऊस आणि पाणी ओसरल्याने मदतकार्यास वेग आला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...