Agriculture news in marathi, Heavy rainfall in Sangli district reduces soybean production | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उताऱ्यात घट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

यंदा पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात एकरी उतारा कमी झाला. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.
- तात्यासो नागावे, शेतकरी, खटाव, जि. सांगली.

सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. त्यातून बचावलेल्या सोयबीन पिकांची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, उतारा कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

जिल्ह्यात ३८ हजार ५०६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. पीक चांगले बहरू लागले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात महापूर आला. यामुळे पिकात पाणी साचून राहिले होते. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे सोयाबीनची काढणी रखडली होती. पावसाची उघडीप मिळाल्याने शेतकरी सोयाबीन काढणीची लगबग सुरू झाली आहे. एकाच वेळी सोयाबीनची काढणी आली आहे. यामुळे मजूर वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पाच ते सहा दिवस अगोदरच मजुरांचे नियोजन करत आहेत. सोयाबीन काढणीला एकरी  ३००० ते ३२०० रुपये घेतले जात आहेत.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शेतात पाणीसाचून राहिले होते. त्यामुळे पिकाची वाढ अपेक्षित झाली नाही. त्याचा फटका उत्पादनावर झाला आहे. गेल्यावर्षी सरासरी एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळाले होते. मात्र, या महापुरामुळे एकरी ९ ते १० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मळणी महागली 
सातत्याने डिझेलचे दर वाढत असल्याने ट्रॅक्टर मालकांनी मळणीचे दर वाढविले आहेत. गेल्या वर्षी एका पोत्याला १५० रुपये असा दर शेतकऱ्यांकडून घेतला जात होता. या वर्षी ५० रुपयांनी वाढ केली असून आता एका पोत्याला २०० रुपये असा दर आहे.

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...