विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

विजांच्या कडकडाटासह  सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. बुधवारी (ता. ९) पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान शिडवणे (ता. कणकवली) परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. भातशेतीलादेखील फटका बसला.

जिल्ह्यात मंगळवारी सांयकांळी चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. विजांचा लखलखाट आणि त्यानतंर होणारा कडकडाट, यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला. त्यातच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले.

बुधवारी पहाटेपर्यंत हा पाऊस सुरू होता. कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ या परिसरांत पावसाचा जोर अधिक होता.

दरम्यान, मंगळवारी सायकांळी शिडवणे, वारगाव, साळीस्ते (ता. कणकवली) या परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यात घरे, शाळांच्या छप्पराचे नुकसान झाले. भातशेती भुईसपाट झाली. शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com