सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेत बरसला जोरदार पाऊस

सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेत बरसला जोरदार पाऊस
सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेत बरसला जोरदार पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक शेतांत पाणी साचले आहे. शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण असून, पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात २४ तासांत १.८४ टीएमसीने वाढ झाली आहे. 

कोयना पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजरी लावली. धरण क्षेत्रातील कोयना १३८, नवजा १७३ व महाबळेश्वर येथे १५७ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात २४ तासांत १.८४ टीएमसीने वाढ झाली. शनिवारी(ता.२९) सकाळी आठपर्यंत १२.२६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. सातारा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. 

कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत बहुतांशी पावसाची रिपरिप सुरू होती. महाबळेश्वर, जावळी या तालुक्यात सर्वाधिक पाऊस सुरू आहे. दुष्काळी माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुष्काळी तालुक्यात टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा जोर वाढणे आवश्‍यक आहे.

पश्‍चिम भागात सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पेरण्यांना वेग येणार आहे. आडसाली उसाच्या लागवडीस वेग येणार आहे. कोयनासह इतर धरणात पावसचा जोर वाढला असल्याने याही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com