राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस; पेरण्या सुरू

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त बरसला आहे. त्यामुळे काही भागांत पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
Heavy rains in 218 talukas in the state; Start sowing
Heavy rains in 218 talukas in the state; Start sowing

पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त बरसला आहे. त्यामुळे काही भागांत पेरण्यांना सुरुवात झाली आहे. 

मॉन्सूनचे आगमन यंदा बहुतेक तालुक्यांमध्ये दमदार ठरले आहे. १ ते १४ जून या कालावधीत २१ जिल्ह्यांमधील २१८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशीम, बुलडाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, नगर, पालघर, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. 

चालू आठवड्यापर्यंत विदर्भात गोंदिया, अकोला, भंडारा, तर पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा, पुणे याशिवाय धुळे, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. नाशिक, जळगाव, कोल्हापूर, गडचिरोलीत मात्र ५० टक्क्यांच्या आत पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात असून, तो २५ टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांमध्ये पेरण्यांबाबत शेतकऱ्यांना सावधपणे निर्णय घ्यावे लागणार आहेत. 

राज्यात एरवी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी ९६ मिलिमीटर पाऊस होतो. पण यंदा तो ११८ मिलिमीटरच्या आसपास झालेला आहे. म्हणजेच सरासरीच्या १२० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काही भागात खरिपाच्या पेरण्या सुरू करीत त्या साडेचार लाख हेक्टरच्या आसपास नेल्या आहेत. ऊस पिकासह राज्यात एकूण साडेसात लाखांच्या पुढे पेरा झालेला आहे. राज्याच्या बहुतेक भागात मात्र अजूनही शेतकरी पूर्वमशागतीची कामे करीत आहेत. 

दुसऱ्या बाजूला कोकणात रोपवाटिकांच्या पेऱ्याला काही गावांमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. पालघरला १७४ हेक्टर, रत्नागिरीत ९४०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२१ हेक्टरवर रोपवाटिकांसाठी पेरण्या झाल्या आहेत. नाशिक विभागाच्या आदिवासी पट्ट्यात भात व नागलीच्या रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय मका व कपाशीच्या पेरण्यादेखील सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या भात उत्पादक पट्ट्यात शेतकरी भात, नाचणीच्या रोपवाटिका तयार करण्यात गुंतलेले आहेत. औरंगाबाद विभागात पेरण्या २-३ टक्के झालेल्या आहेत. लातूर विभागात मात्र १४ जूनअखेर पेरण्याची नोंद कोणत्याही जिल्ह्यात झालेली नाही. अमरावती विभागात पेरा ३ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. राज्यात चार लाख हेक्टरवर यंदा उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांनी घेतला. कृषी विभागाने उन्हाळी हंगामाच्या अंतिम अहवालात एकूण पेरा २२२ टक्के झाल्याचे  म्हटले आहे. यात उन्हाळी भात, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com