Agriculture news in Marathi Heavy rains in 218 talukas in the state; Start sowing | Page 3 ||| Agrowon

राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस; पेरण्या सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 जून 2021

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त बरसला आहे. त्यामुळे काही भागांत पेरण्यांना सुरुवात झाली आहे. 

पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त बरसला आहे. त्यामुळे काही भागांत पेरण्यांना सुरुवात झाली आहे. 

मॉन्सूनचे आगमन यंदा बहुतेक तालुक्यांमध्ये दमदार ठरले आहे. १ ते १४ जून या कालावधीत २१ जिल्ह्यांमधील २१८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशीम, बुलडाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, नगर, पालघर, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. 

चालू आठवड्यापर्यंत विदर्भात गोंदिया, अकोला, भंडारा, तर पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा, पुणे याशिवाय धुळे, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. नाशिक, जळगाव, कोल्हापूर, गडचिरोलीत मात्र ५० टक्क्यांच्या आत पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात असून, तो २५ टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांमध्ये पेरण्यांबाबत शेतकऱ्यांना सावधपणे निर्णय घ्यावे लागणार आहेत. 

राज्यात एरवी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी ९६ मिलिमीटर पाऊस होतो. पण यंदा तो ११८ मिलिमीटरच्या आसपास झालेला आहे. म्हणजेच सरासरीच्या १२० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काही भागात खरिपाच्या पेरण्या सुरू करीत त्या साडेचार लाख हेक्टरच्या आसपास नेल्या आहेत. ऊस पिकासह राज्यात एकूण साडेसात लाखांच्या पुढे पेरा झालेला आहे. राज्याच्या बहुतेक भागात मात्र अजूनही शेतकरी पूर्वमशागतीची कामे करीत आहेत. 

दुसऱ्या बाजूला कोकणात रोपवाटिकांच्या पेऱ्याला काही गावांमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. पालघरला १७४ हेक्टर, रत्नागिरीत ९४०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२१ हेक्टरवर रोपवाटिकांसाठी पेरण्या झाल्या आहेत. नाशिक विभागाच्या आदिवासी पट्ट्यात भात व नागलीच्या रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय मका व कपाशीच्या पेरण्यादेखील सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या भात उत्पादक पट्ट्यात शेतकरी भात, नाचणीच्या रोपवाटिका तयार करण्यात गुंतलेले आहेत. औरंगाबाद विभागात पेरण्या २-३ टक्के झालेल्या आहेत. लातूर विभागात मात्र १४ जूनअखेर पेरण्याची नोंद कोणत्याही जिल्ह्यात झालेली नाही. अमरावती विभागात पेरा ३ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. राज्यात चार लाख हेक्टरवर यंदा उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांनी घेतला. कृषी विभागाने उन्हाळी हंगामाच्या अंतिम अहवालात एकूण पेरा २२२ टक्के झाल्याचे  म्हटले आहे. यात उन्हाळी भात, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचा समावेश आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी यापुढे...कोल्हापूर : सातत्याने निर्माण होणाऱ्या पूर...
दोष पीकविमा कंपन्यांचा, रोष आमच्यावर;...पुणे ः पीकविमा योजनेचे कंत्राट मिळवलेल्या खासगी...
दिवेकर, ताटेंसह १४ कृषी उपसंचालकांच्या...पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयातील ठिबक कक्षाचे...
मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर हलका...पुणे : राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी...
पीकविमा तक्रार निवारण व्यवस्थेचे तीन...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत समस्या किंवा...
यवतमाळ जिल्ह्यात वाघांची संख्या वीस यवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात...
बावीस जिल्ह्यांत उभारणार तेलघाणे नागपूर ः विदर्भात तेलबियावर्गीय पिकांना...
सोयाबीन पिकाची किडीकडून चाळणआर्णी, जि. यवतमाळ : तालुक्यातील लोणी येथील...
‘आयटी’ मित्रांची शेती व्यवस्थापन कंपनीतुमची शेती आमच्यावर सोपवा, आम्ही आधुनिक...
लवांडे यांनी उभारली चारा पिकांची...फत्तेपूर (जि.. नगर) येथील अल्पभूधारक सोमेश्वर...
‘एफपीओं’ना बनवा अधिक कार्यक्षमशेतीसाठीच्या सध्याच्या अत्यंत प्रतिकूल अशा...
विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे...
नुकसानीच्या दोन लाखांहून अधिक सूचना...पुणे ः राज्यभर कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये...
विमा कंपन्यांच्या नफेखोरीला सरकारी...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेचा कारभार गेल्या...
राज्यात हलका, मध्यम पावसाची हजेरी पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने...
महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा...मुंबई : महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची...
केबल शेडनेटला आता अनुदान पुणे ः राज्याच्या संरक्षित शेतीला चालना...
शेळीपालनापाठोपाठ घरालाही दिले ‘ॲग्रोवन...औरंगाबाद : शेतकऱ्याचं ‘ॲग्रोवन’वरचं प्रेम पुन्हा...
शेतकरी कंपन्यांसाठी २०० कॉपशॉप साकारणार पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना...
एकोप्याच्या बळावर बदलले वडगाव गुप्ताचे...दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या वडगाव गुप्ता (ता. जि....