Agriculture news in marathi Heavy rains in 40 revenue boards of the Nagar | Agrowon

नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

नगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३) पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. ४० महसूल मंडळांत चांगला पाऊस झाला.

नगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३) पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. ४० महसूल मंडळांत चांगला पाऊस झाला. आतापर्यंत यंदाच्या पावसाच्या सरासरीत दहा टक्के पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. 

जिल्हयात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. नगर, राहुरी, अकोले, कर्जत, पारनेर, पाथर्डी भागात, रात्री आठनंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गावतलाव, पाझर तलावासह बंधाऱ्यांत पाणी साठले. निसर्ग चक्रीवादळाचाही काहिसा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. बुधवारी दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढला. पावसाची रिमझिम दिवसभर सुरु होती. या पावसामुळे काही प्रमाणात फळे, भाजीपाल्याला फटका बसला.

खरिपाच्या शेतमशागतीला वेग येणार आहे. अजून काही प्रमाणात पाऊस झाला तर मॉन्सून येण्याआधीच पेरणी, कापूस लागवडीला वेग येणार आहे. आतापर्यंत पारनेरमध्ये वीस टक्के तर कर्जत, श्रीरामपुरमध्ये सोळा टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला आजीबात पाऊस नव्हता.   

मंडळनिहाय पाऊस (मि.मी) 

काष्टी, चिंभळा, नायगा ः २४, बेलवंडी ः २६, मांडवगण ः ४०, कर्जत ः २८, कोंभळी ः २२, राहुरी ः २८, वांबोरी ः २३, देवळाली प्रवरा ः २९, नेवासा ः ३४, सलाबतपूर ः ४०, कुकाणा ः ३०, चांदा ः २२, घोडेगाव ः २१, नालेगाव ः ३८, जेऊर ः ३०, रुईछत्तीशी ः ३०, चास ः २७, भिंगार ः ३९, वाळकी ः ३२, चिचोंडी पाटील ः २५, सावेडी ः ३७, टाकळी मानुर - ३७, कोरडगाव ः ३१, शेवगाव ः ३२, चापडगाव ः ४७, भातकुडगाव ः २० पारनेर ः ३६, सुपा ः ३०, वाडेगव्हाण ः २८, टाकळा ढोकेश्वर ः २६, संगमनेर ः २४, साकुर ः २६, अकोले २७, कोतुळ ः २६.


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...