Agriculture news in marathi heavy rains affects horticrop plantation, pune | Agrowon

फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला अडसर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत फळबाग लागवडी ठप्प झाल्या आहेत. जिल्ह्यात १९ नोव्हेबरअखेरपर्यंत अवघ्या २४६ शेतकऱ्यांनी १६५ हेक्टरवर फळबाग लागवडी केल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात फळबाग लागवडी होणार असल्याचे चित्र आहे.

पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत फळबाग लागवडी ठप्प झाल्या आहेत. जिल्ह्यात १९ नोव्हेबरअखेरपर्यंत अवघ्या २४६ शेतकऱ्यांनी १६५ हेक्टरवर फळबाग लागवडी केल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात फळबाग लागवडी होणार असल्याचे चित्र आहे.

फळबाग लागवडीची योजना मनरेगामार्फत राबविण्यात आली होती. त्याला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळल्याने गेल्या वर्षीपासून खरीप हंगामात फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात आली. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे फळबाग लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सलग राहिलेल्या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात लागवडी होऊ शकल्या नाहीत.

यंदा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ८ कोटी ४४ लाख ३९ हजार रुपयांचे आर्थिक उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी एक हजार ७७५ अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी फळबाग लागवडी केल्यास सुमारे एक हजार ४१९ हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फक्त कलमांद्वारेच लागवड (अपवाद नारळ), घन लागवड, इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आदि बाबी राबविता येणार होत्या. या योजनेअंतर्गत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, नारळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदि फळपिकांची लागवड करता येणार आहे.

आत्तापर्यंतची लागवड हेक्टरमध्ये... 

तालुका आर्थिक लक्ष्यांक आलेले अर्ज शेतकरी संख्या झालेली लागवड
भोर ४८.११ ५३ २४ ११.४०
हवेली ४९.०८ ७० .... ...
वेल्हा २८.३५ ६१ २.००
मावळ ४८.८३ ४५ ०.२५
मुळशी ४५.६० २९ ४.००
खेड ७१.२३ ६६  १५  ७.९०
आंबेगाव ५९.१६ ८२ ५.६२
जुन्नर ७३.१९  २१६ ६७ ६०.०३
शिरूर ९४.९१ १६७ ०  ० 
पुरंदर ६३.८९  ३२६ ११२ ६०.७५
दौंड ८१.२२ २३७ ३  १.५०
बारामती ९१.०३ ३११
इंदापूर ८९.७९ ११२ १२.४५
एकूण ८४४.३९   १७७५ २४६.०० १६५.९०

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...