Heavy rains again in Parbhani, Hingoli district
Heavy rains again in Parbhani, Hingoli district

परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार, पुन्हा नुकसान

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची उघडीप दिली. त्यानंतर गुरुवारी (ता.२२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली.

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची उघडीप दिली. त्यानंतर गुरुवारी (ता.२२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली. यामुळे कपाशी, केळी, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. सोयाबीन काढणी, कापूस वेचणीची कामे तसेच वाफसा झालेल्या जमिनीवर रब्बी ज्वारी, हरभरा पेरणीची कामे सुरु झाली होती. परंतु, गुरुवारी (ता.२२) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास या दोन जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये वादळी, वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

परभणी तालुक्यातील बोरवंड, तरोडा आदी गावांसह जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे बोंडातील कापूस गळून पडला आहे. वादळामुळे केळीची झाडे मोडून पडली. 

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी,सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील ४२ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. शिंगणापूर मंडळात जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील १२ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात पावसाचा जोर होता.

मंडळनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा ः परभणी शहर १४.८, परभणी ग्रामीण १४.८, शिंगणापूर ४१.८, दैठणा १४.८,जांब १४.८, झरी १४.८, हादगाव २४.८, कासापुरी १२, गंगाखेड ११,  माखणी १५.३. हिंगोली जिल्हा ः आजेगाव १२.८, साखरा ११, पानकन्हेरगाव १०.८, हत्ता ११.

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परिसरातील अनेक गावांत अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. गारा पडल्या. सोयाबीननंतर आता कपाशी, केळीचे नुकसान झाले. - माणिकराव सूर्यवंशी, शिंगणापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com