agriculture news in marathi Heavy rains again in Parbhani, Hingoli district | Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार, पुन्हा नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची उघडीप दिली. त्यानंतर गुरुवारी (ता.२२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली.

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची उघडीप दिली. त्यानंतर गुरुवारी (ता.२२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट झाली. यामुळे कपाशी, केळी, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. सोयाबीन काढणी, कापूस वेचणीची कामे तसेच वाफसा झालेल्या जमिनीवर रब्बी ज्वारी, हरभरा पेरणीची कामे सुरु झाली होती. परंतु, गुरुवारी (ता.२२) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास या दोन जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये वादळी, वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

परभणी तालुक्यातील बोरवंड, तरोडा आदी गावांसह जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे बोंडातील कापूस गळून पडला आहे. वादळामुळे केळीची झाडे मोडून पडली. 

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी,सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील ४२ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. शिंगणापूर मंडळात जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील १२ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात पावसाचा जोर होता.

मंडळनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा ः परभणी शहर १४.८, परभणी ग्रामीण १४.८, शिंगणापूर ४१.८, दैठणा १४.८,जांब १४.८, झरी १४.८, हादगाव २४.८, कासापुरी १२, गंगाखेड ११,  माखणी १५.३.
हिंगोली जिल्हा ः आजेगाव १२.८, साखरा ११, पानकन्हेरगाव १०.८, हत्ता ११.

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परिसरातील अनेक गावांत अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. गारा पडल्या. सोयाबीननंतर आता कपाशी, केळीचे नुकसान झाले.
- माणिकराव सूर्यवंशी, शिंगणापूर


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...