Agriculture news in marathi Heavy rains in Agalgaon area | Agrowon

आगळगाव परिसरात गारांचा पाऊस 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

ढालगाव, जि. सांगली : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील परिसरात गुरुवारी (ता. १६) दुपारी सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाल्याने बेदाणा शेडवर टाकलेल्या बेदाण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाण्याचा दर्जा घरण्याची शक्यता आहे. पाऊस आगळगाव, शेळकेवाडी, केरेवाडी व कुचीच्या काही भागात पाऊस झाला आहे. पावसाने शेतातील बांध भरून गेले आहेत. 

ढालगाव, जि. सांगली : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील परिसरात गुरुवारी (ता. १६) दुपारी सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाल्याने बेदाणा शेडवर टाकलेल्या बेदाण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाण्याचा दर्जा घरण्याची शक्यता आहे. पाऊस आगळगाव, शेळकेवाडी, केरेवाडी व कुचीच्या काही भागात पाऊस झाला आहे. पावसाने शेतातील बांध भरून गेले आहेत. 

‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाने लाॅकडाऊन करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत द्राक्षाला मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बेदाणा तयार करण्यासाठी आगळगाव, शेळकेवाडी येथील भागातील शेडवर टाकलेला आहे. आणि नेमकं याच भागात दुपारी जोरदार पाऊस व गारा पडल्या आहेत. यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी टाकलेला माल भिजला आहे. तर काही शेडचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

आगळगाव हद्दीत शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांच्या मदतीने दहा शेतकऱ्यांनी पंचेचाळीस हजार पेटी माल टाकला आहे. आगळगाव व शेळकेवाडी भागात चाळीसवर शेड आहेत. भागात काही जणांचे ज्वारीची पिके काढायची आहेत. काहींनी काढून शेतात टाकली आहेत. ती भिजून गेली आहेत. 

शेतकऱ्यांना पुराणे मारले. आता ‘कोरोना’ने संपविले. पावसाने मोठ्या प्रमाणावर बेदाणा काळा पडतो. त्यामुळे मालाला दर येत नाही. शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न पडला असून प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. 
- महेश खराडे, 
जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...