Agriculture news in marathi; Heavy rains in Balpur, Barsitakali, Khamgaon and Malkapur | Agrowon

बाळापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूरला जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यात महान मंडळात ८० तर खेर्डा मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसाच, जोरदार पाऊस खामगाव, मलकापूर तालुक्यांतही झाला आहे.

अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यात महान मंडळात ८० तर खेर्डा मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसाच, जोरदार पाऊस खामगाव, मलकापूर तालुक्यांतही झाला आहे.

या विभागात मागील काही दिवसांत पावसाची सातत्याने हजेरी लागत आहे. असंख्य ठिकाणी अतिपावसामुळे खरिपातील पिकांवर संकट उभे राहत आहे. गेल्या २४ तासांत पाच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा ७३ मिलिमीटर, पिंजर ५०, महान ८० मिलिमीटर पाऊस झाला. अकोला ३४.८, बाळापूर ४३, पारस ४९, व्याळा ५०, वाडेगाव ४९.८, उरळ ४४.५ मिलिमीटर नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव ४५.५, पिंपळगावराजा ३८.५,  लाखनवाडा २३, हिवरखेड ३३.८, काळेगाव ३५.३,  आवार ३५, पारखेड ४०, दाताळा ४१.३,  नरवेल ५८.८ मिलिमीटर पाऊस पडला. 

सध्याचा हा पाऊस खरिपातील पिकांसाठी आता बाधक ठरू पाहत आहे. मूग, उडदाची काढणी सुरू असून त्यावर परिणाम झाला. सततच्या पावसाने पिकांमध्ये पाणी साचण्याचेही प्रकार वाढले. कपाशी पिकात सततच्या ओलाव्यामुळे झाडांवर धरलेल्या बोंड्या काळवंडत असून अनेक ठिकाणी बुरशीही वाढत आहे. सोयाबीनलाही फटका बसत आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...