Agriculture news in marathi; Heavy rains in Balpur, Barsitakali, Khamgaon and Malkapur | Page 2 ||| Agrowon

बाळापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूरला जोरदार पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यात महान मंडळात ८० तर खेर्डा मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसाच, जोरदार पाऊस खामगाव, मलकापूर तालुक्यांतही झाला आहे.

अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यात महान मंडळात ८० तर खेर्डा मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसाच, जोरदार पाऊस खामगाव, मलकापूर तालुक्यांतही झाला आहे.

या विभागात मागील काही दिवसांत पावसाची सातत्याने हजेरी लागत आहे. असंख्य ठिकाणी अतिपावसामुळे खरिपातील पिकांवर संकट उभे राहत आहे. गेल्या २४ तासांत पाच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा ७३ मिलिमीटर, पिंजर ५०, महान ८० मिलिमीटर पाऊस झाला. अकोला ३४.८, बाळापूर ४३, पारस ४९, व्याळा ५०, वाडेगाव ४९.८, उरळ ४४.५ मिलिमीटर नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव ४५.५, पिंपळगावराजा ३८.५,  लाखनवाडा २३, हिवरखेड ३३.८, काळेगाव ३५.३,  आवार ३५, पारखेड ४०, दाताळा ४१.३,  नरवेल ५८.८ मिलिमीटर पाऊस पडला. 

सध्याचा हा पाऊस खरिपातील पिकांसाठी आता बाधक ठरू पाहत आहे. मूग, उडदाची काढणी सुरू असून त्यावर परिणाम झाला. सततच्या पावसाने पिकांमध्ये पाणी साचण्याचेही प्रकार वाढले. कपाशी पिकात सततच्या ओलाव्यामुळे झाडांवर धरलेल्या बोंड्या काळवंडत असून अनेक ठिकाणी बुरशीही वाढत आहे. सोयाबीनलाही फटका बसत आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार...सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्...
बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख...बुलडाणा  ः  जिल्ह्याच्या रब्बी...
वेतोरेतील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसानसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि...
परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
चौथ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळनाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी...
परभणीत हरभरा पीक व्यवस्थापनासाठी २१९...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (...
बाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पुणे, मुंबई बाजार समित्यांच्या निवडणुका...पुणे ः राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणांमुळे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे ५० टक्के...सिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार...
पुणे बाजार समितीत स्थानिक नव्या...पुणे  ः पावसामुळे बटाट्याचे आगार असलेल्या...
पुणे विभागात रब्बीचे क्षेत्र दीड लाख...पुणे  ः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात...
आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १६ हजार...मंचर, जि. पुणे  : अतिवृष्टीमुळे आंबेगाव...
सातारा जिल्ह्यात खरिपासाठी ७८ टक्के...सातारा  ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९२०...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साडेचार लाख...नगर  ः अतिवृष्टीने जिल्ह्यातील १५८३ गावांतील...
अकोट तालुक्यातील केळी उत्पादकांचा...अकोला  ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळी...
राज्यात शेतकरी मदत केंद्रे उभारणार :...कडेगाव, जि. सांगली  : अतिवृष्टी व...
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचेच सरकार...नागपूर  ः राज्यात शिवसेना, काँग्रेस,...
भाजपचे नेतृत्व असलेले सरकारच...मुंबई  ः भाजपचे १०५ आमदार निवडून आले...
शिवसेना आणि आमचे जुळू नये असा भाजपचा...मुंबई ः मुख्यमंत्रिपदाबाबत मी काहीही बोलणार नाही...